STORYMIRROR

Anita Bodke

Others

3  

Anita Bodke

Others

ओठावरती जरी अबोला....

ओठावरती जरी अबोला....

1 min
450

ओठावरती जरी अबोला डोळ्यामध्ये आग किती

नाही नाही म्हणता त्याला येतो माझा राग किती!


जसे पाहिले तुला एकदा दारामध्ये उभे तुझ्या

नको विचारू मला तशी तू झोप किती अन जाग किती?


सोडुन आले सारे काही हाकेवर एकाच तुझ्या

कळले आहे किती तुला मी, कळला माझा त्याग किती?


ओली होती जोवर माती बहरुन आली होती ती

ओल संपली मायेची अन सुकून गेली बाग किती!


काही केल्या जाईना तो प्राण आणले कंठाशी

खरे सांगना तुझा राग हा मग प्रेमाचा भाग किती?


दिसते आहे इथे कुणाला उजळुन येणे चंद्राचे

जो येतो तो बघतो आहे त्याच्यावरती डाग किती?



साहित्याला गुण द्या
लॉग इन