देवी काली
देवी काली
1 min
158
देवी कालीस आज
माळ सातवी वाहूया
शुभंकर, शुभदायीनी शुभ
रूप ते पाहुया
भयावह रुप दिसे ते
काळे शरीर त्रिनेत्री देवीचे
विखूरलेले केस
चंडीका, महाकाली हेच ते रूप
गर्दभ वाहनी बैसे थाटात
खडग धारण हातात
दैत्य दानव संहारिणी
हिच असे माता पार्वती
दिसण्यास दिसे भयावह
पर करी दुष्टांचा संहार
कनवाळू ती भक्तांसाठी
येइ वेगे धावून
मनोभावे आरती करू
करू तिचे पुजन
