==* तू समजून घे भाव माझ्या मनाचे *==
==* तू समजून घे भाव माझ्या मनाचे *==
तू लिहितो तुझ्या मनाचेच सारे
जे लिहितो रे तू सत्य त्यात नाही
तू विद्रोह करतो तुझ्या लेखनाशी
ओकतो आग जी त्यात बात नाही
या शब्दांना देतो द्वेषाची भाषा
तुला जाण रे या शब्दांची नाही
किती तोडले नाते रक्तांचे यांनी
तू परी थोडका तुला भान नाही
तू जागृत हो खऱ्या वास्तवाशी
जे काल होते ते बघ आज नाही
जरी हा दिवस मिळाला तुला रे
दिवस रोजचा सारखा येत नाही
काय चालायची रीत ही सारखी
वाद वर्षानुवर्षे का याला तोड नाही
तुला सांगतो राग येतो मलाही
मला मात्र लढण्या आता वेळ नाही
मी केले मनाचे माझ्या द्वार मोठे
भुंकण्याला तुझ्या मी भेत नाही
मी म्हणतो जगावं आता एकोप्याने
आग रक्ताची थंड्या तुझ्या जात नाही
तू समजून घे भाव माझ्या मनाचे
तुला नेहमी सांगणारा मी नाही
हि लिहिली कविता जरी एकट्याने
तू समजून घे एकटा मी ही नाही