शिक्षक दिन
शिक्षक दिन
पहिल्या दिवशी शाळेत
आईच बोट धरून आले।
थोडे वाटले वाईट पाहिल्यादिवशी
मला धीर देऊन बाई तुम्हीच शांत केले।
धरला मायेने माझा हात
माझ्याशी प्रेमाने बोलल्या।
हुशार आहे ना तू म्हणत,
पुसल्या माझ्या पापण्या ओल्या।
हातात दिला खडू माझ्या
हाताला धरून माझ्या बाराखडी गिरवली।
तुम्हीच मला हळूहळू
शाळेची गोडी लावली।
मातीचा गोळा होते मी,
शाळेत जेंव्हा तुमच्या आले।
हळू हळू आकार देत तुम्ही
मला सुंदर घडा बनवले।
मेणबत्ती स्वतः होऊन तुम्ही
जीवनात माझ्या प्रकाश केला।
आभार मानते बाई तुमचे मी ,अन
शुभेच्छा शिक्षकदिनी आज तुमच्यासारख्या सर्व शिक्षकांना।
