STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3.3  

Shila Ambhure

Others

सांज

सांज

1 min
764




झाली सांज सखे बाई

झाली सांज सखे बाई।।धृ।।


गुरे आलिया गोठ्यात

पक्षी निजले खोप्यात

जीव शीणलेले कसे

विसावले गं सोप्यात

बाळ तानुले चाटते

पान्हा आईचा गं बाई।।1।।


झाडे झाली निपचित

वेली पहुडल्या शांत

देवळात दिवा कसा

बाई तेवतो निवांत

तूही नीज रे सानुल्या

तुला गाते मी अंगाई।।2।।


आवा पेटवीति चुली

खाऊ घालिती भाकरी

टीचभर पोटासाठी

सारे करिती चाकरी

रातभर हा विसावा

उदया कामाचीच घाई।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन