Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

आकारांची गोष्ट

आकारांची गोष्ट

1 min
373


ऐका ऐका गमतीची

गोष्ट ऐका गमतीची।।धृ।।


गणिताचे तीन आकार

मित्र तिघे फार हुशार

गोल, त्रिकोण,चौकोन

अशी नावे त्या तिघांची।।1।।


त्रिकोणाला तीन कोन

चौकोनाला चार कोन

एकत्र येऊन दोघेजण

गोलाला पाहून हसायची।।2।।


गोल कसा गोलमटोल

लगेच जाई त्याचा तोल

गडगडत तो चालायचा

सवय त्याला पळायची।।3।।


तिघे मिळून जंगलात गेले

वाघ पाहून खुप घाबरले

काय करावे काही सूचेना

घाई झाली धावायची।।4।।


कोनांना पळता येइना

गोलाला काही राहवेना

मित्रांची वाटली काळजी

युक्ती शोधली निसटायची।।5।।


गोलाने धरले दोघांचे हात

घरंगळू लागले जोरजोरात

जंगल राहिले दूर मागे

भीती नाही आता वाघाची।।6।।


Rate this content
Log in