ही वाट एकटीच
ही वाट एकटीच
1 min
6.7K
एकटीच वाट ती जराशी शांत
आपुल्याच नादात नाहीच भ्रांत
डोंगराला घालून वळसा गोल
कसाबसा सावरायची गं तोल
रुक्ष, नीरस, अलिप्त ती एकाकी
एकटीच ती नव्हते कुणी बाकी
सोबतीला आता तिच्या एक झरा
साथीदार तिला तो वाटतो बरा
साथ त्यांना द्याया रानफुले आली
वाट ती आज लेकुरवाळी झाली
मनसोक्त हिंडते आज ती रानी
पाऊसधारात गाते चिंब गाणी