खेळ शब्दांचा
खेळ शब्दांचा
1 min
194
उतरतात शब्द कागदावर
भरून येतात भावना।
एकमेकांत शब्द गुंफून
खेळ शब्दांचा मांडावा।
कोरा कागद हातात घेते,
तेंव्हा शब्दांचे चालू खेळ।
हा शब्द मांडू की ,तो म्हणून
शब्दांचा बसवावा लागतो मेळ।
शब्दांच्या खेळाची जादू असते
योग्य ठिकाणी योग्य मांडते।
लेखणी माझी मला साथ देते
शब्दांच्या सह सुंदर कविता होते।
