STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

घड्याळ

घड्याळ

1 min
5.9K



(चाल=झुकझुक आगिनगाड़ी)


टिक टिक टिक घड्याळ चाले

वाजले किती आम्हाला सांगे

घड्याळाची माहिती घेऊया

हसत खेळत शिकूया।।धृ।।


घडयाळाचे काटे तीन

फिरत असती रात्रंदिन

काट्यांची नावे सांगुया।।1।।


तासाचा जाड काटा

मिनिटाचा उंच मोठा

सेकंदकाटा शोधूया।।2।।


घड्याळात अंक बारा

करत नाही ते पसारा

अंकांची नावे सांगूया।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन