STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मुले

मुले

1 min
163

मुले खरच किती

भरकन मोठे होतात।

मांडीवर असलेली

हळू हळू रांगायला लागतात।


रांगता रांगता हळूच

धडपडत उभे राहतात।

बोट धरून चालणारे मूल

अलगद सोडून पळायला लागतात


शाळा संपते हळू हळू

मग अकरावीत प्रवेश।

बारावी होती मग त्याची

धावतपळत।


वसतिगृहात जायची त्यांची

येती जेंव्हा वेळ।

सोडून जायचं मन होत नाही

पुढच्या आयुष्याचा बसवायचा असतो ताळमेळ।


समजदारीने मग ते,

मोठया माणसासारखी वागतात।

काळजी करू नका माझी

तुमची काळजी घ्या असे सांगतात


मुले प्रत्येकाची असतात गुणी

वेळ आल्यावर प्रत्येकजण ।

जबाबदारीने वागतात कारण

त्यांना आठवत मायेने जपलेलं

आपलं बालपण।


Rate this content
Log in