उग्र होत होत चाललेली जातीयता
उग्र होत होत चाललेली जातीयता
उग्र होत होत चाललेली जातीयता, लोपलेल माणूसपण अन - लिमिटेड माणूसकी
जगातील सर्व धर्म हे प्रेम आणि नैतिक मूल्यावरच आधारित आहेत. माणसाला माणूस म्हणून वागवणेच शिकवतात. माणसाचं जीवन सुकर व्हावं यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुभावही आवश्यकच. त्यावर सर्वधर्म अन् पर्यायाने माणसाचं अस्तित्व अवलंबून आहे हेही तितकंच खरं आहे. राग, लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष, वाईट आहे. प्रेम, नीतिमत्ता, परस्पर बंधुभाव जपावा आणि माणसाने माणसांशी माणसासारखं मागणे शिकवतो. परंतु अलीकडील काळात स्वार्थासाठी राजकारण्यांनी स्वतःचं हीत साधण्यासाठी कट्टर जातीयवादी भूमिका घेतल्याने समाजात दुही निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागते आणि ते संपूर्ण सत्य आहे. जात नष्ट व्हावी आणि जातीभेद नाहीसा करावा यासाठी कोणीही ६० - ७० वर्षात प्रामाणिक प्रयत्न केला नाही. सगळ्यांना स्वार्थापुरती जात हवीच आहे. मुलाचं शाळेतील पाहिलं पाऊल पडताच त्याला त्याची जात दाखवली जाते व त्याला ती आयुष्यभर चिकटून राहते. जातीयभेद मनातून तेव्हाच जाऊ शकेल जेव्हा शाळेच्या जन्माच्या दाखल्यावरील जात कढून टाकली जाईल. परंतु जातीचे राजकारण केल्याशिवाय पुढाऱ्यांचे भागणार नाही की भोळ्या भाबड्या लोकांना जातीत विभागून स्वार्थ साधणाऱ्या लोंकाचे. उलट अलीकडील काळात जातीयता आणखीनंच उग्र रूप धारण करीत आहे आणि हे लोकशाहीसाठी खूप मोठा धोका निर्माण करू पाहत आहे.
प्रेम या अडीच अक्षरातच एवढी ताकद असते कि त्यात अवघं विश्वच एक बंधात बांधलं जाऊ शकत. प्रेमाने जगही जिंकता येत. यावरील विश्वंच उडत चाललाय असं वाटू लागल आहे. स्वार्थाने बरबटलेल्या लिमिटेड माणुसकी दाखवणाऱ्यांना काय कळणार प्रेमाची किंमत, त्याच्यालेखी सत्ता नी पैसे हाच धर्म नी त्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो हे दिसून येत आहे. असे असले तरी प्रेम हे अंतिम सत्य आहे प्रेमाने प्रेम मिळवता येते.
प्रेमाला मर्यादा नसतात, प्रेमाला कुठलेही मापदंड नसतात म्हणून तर प्रेमाची ताकद कदापि मोजता येत नाही. तसंच असतं माणसाच्या माणुसकीचं, माणूसपणाचं. आधुनिक युगात माणूस आत्मकेंद्रित होत गेला तसतसं त्याला स्वार्थी, भोगविलास, लालसा साद घालू लागली. अन् इथेच माणसाचा माणूसपणावरील विश्वास कमी होत गेला आणि लिमिटेड माणुसकी अन आता तर हैवानीयात बघावयास मिळत आहे .
परंतु याचबरोबर महाराष्ट्र राज्यात फुले, शाहू, आंबेडकर चळवळीने चांगलाच जोर धरला असल्याकारणाने जनता सुजाण झाली आहे. त्यामुळे लोकशाही व संविधानाचे पावित्र्य राखण्यास सक्षम बनले आहे. या जातीयतेचे दूषित वातावरण पुन्हा निवळून सर्वजण बंधुभाव टिकवून ठेवण्यास समर्थ आहेत हेही तितकेच खरे आहे.