Abasaheb Mhaske

Others Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Others Tragedy

सल

सल

3 mins
8.8K


 अन्नपूर्णा आज फारच उदास झाली होती, इच्छा नसतानाही ती एक एक काम हातावेगळी करत होती. पण नेहमीचा कामात उरक आणि उल्हास आता उरला नव्हता. त्याला कारणही तसंच होत. सुनीलच आजच वागणं, असं बोलणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. ती मनात पुटपुटली ... किती सहज म्हणालास रे! त्याग, समर्पण तुला काय कळणार ... आरे तुम्हा पुरुषांना आमचं मन कधी कळलं नाही अन कळणारही नाही. तुम्हाला हवी असते फक्त तुमच्या इशाऱ्यावर नाचणारी, मुलांना जम घालणारी  एक मादी, उठ म्हटलं की उठणारी, बस म्हटलं की बसणारी एक बोलकी बाहुली .. म्हणे तुला काय कळणार त्याग समर्पण, तुम्ही पुरुष ना एक नंबरचे खोटारडे, संधीसाधू असता. सगळेच तसे नाही पण सुनील तर नक्कीच आहेस. तुला कसली घमंड रे ...चार खोल्याच घर , फोर  व्हीलर अन मोठ्या पगाराची टीचभर खुर्ची. त्याग, समर्पण तर आम्ही स्त्रिया करतो. पण तुही ते जाणीवपूर्वक दुर्लक्षित करता. माहेर नाव गाव, सारेसारे तुमच्यासाठी सोडून येतो आणि तुम्ही आम्ही तुम्हाला पोस्ट म्हणून मोकळे होता. आरे तुम्ही शिजवता तेवढं अन्न तर माझ्या वडिलांच्या वाड्यावर येणारे जाणाऱ्यांसाठी राखून ठेवलेलं असत. कधी फरक रे माझे अण्णा आणि तुझ्यात ... परिस्तिथीन नसेल कदाचित पण मनाने माझे अण्णा खूप श्रीमंत आहेत. केवढा त्यांचं गोतावळा. गावात केवढा मान, ह्यांना विचारल्याशिवाय गावात पानही हालत नाही. पोरं सोरं गुरं ढोरं, आजीचं दुखणं, बेभरवशाची शेती, सावकारी कर्ज, माझ्या लग्नाचं कर्ज, किती किती व्याप पण  सदैव सुखी असल्याचे भासवणार माझा बाप अन तू ऐश्वर्य, पैसे अडका, सगळं असताना कुरकुरणारा तू. तू, तसा तुझा गोतावळा .. बहीण सासरी कमी इथेच जास्त रमते. सदा न कदा सासू - सासऱ्याचं गाऱ्हाणं, नाही तर मला माझ्या मागे नाव ठेवणं. सासूबाईंच नेहमीचंच तुझ्या बापानं काय दिल. पोटचा गोळा तुमच्या हवाली केली अजून काय पाहिजे. मामंजी चांगले पण त्यांचं कोण ऐकत? सगळे आपल्याच मर्जीचे राजे.

 सुनील तुला काय कळणार मी काय त्याग केला ते, चांगली नोकरी सोडून अण्णांच्या शब्दाखातर करिअर बरबाद करून लग्न करून मोकळी झाले . खोट्या प्रतिष्ठेपायी तू नोकरीही करू दिली नाहीस. आता बसले रांधा, वाढा, उष्टी काढा, चूल आणि मूल सांभाळत. तुम्हा पुरुषांना कधी कळेल रे आमचं आभाळा एवढं मन? त्याग, सर्मपण, आमची निष्ठा? कारण तुम्ही झापड बांधली आहेत डोळ्यांना. तुम्ही गृहीत धरूनच चालता आम्हाला. तुम्ही कितीही शिकलात तरी तुम्ही अडाणीच. साक्षर आहेत इतकच काय तो फरक. आम्हालाही मन असत, भावना असते, आमच्याही काही अपेक्षा असतात तुमचयाकडून.. तुमचा इशाऱ्यावर नाचणाऱ्या कट्पुतल्या नसून आम्ही मनासारखं काहीतरी घडावं असं वाटतच नाही तुम्हा पुरुषांना. आमची अपेक्षा तरी काय आहे तुमच्याकडून? प्रेमाचे बोल, एखाददुसरी साडी, कधीमधी सोबत फिरणं. आनंदात सहभागी करून घेणं. अधूनमधून कामाचं कौतुक करणं. इतकं छोटासा विश्व असत आम्हा बायकांचं. तिनी टी व्ही ऑन केला त्यात गाणं चालू होत .. दुभगंली धरणी माता फाटले आकाश ग .. कधी संपणार नाही तुझा वनवास ग ...


Rate this content
Log in