Prathamesh Dahale

Crime Thriller Others

3  

Prathamesh Dahale

Crime Thriller Others

दृष्टिकोन - भाग 1

दृष्टिकोन - भाग 1

40 mins
390


" समीरsss तिकडे काय करतोय ? इकडे ये... " एका मुलाने लांब एका कारजवळ फोन चालवत उभ्या असणाऱ्या समीरला हाक मारली....समीरने आवाजाच्या दिशेने पाहिले...लांबून त्याचा मित्र सोहम आणि त्याचे इतर मित्र मैत्रिणी गप्पा मारत उभे होते...समीर मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा फोनमध्ये पाहू लागला..

" काय यार , तू पण " सोहम त्याच्याजवळ घाईघाईने येत बोलत होता..." त्या जुनेजा सरांना तू का एवढा सिरियसली घेतोय , त्याला दुसरे काही काम नाहीये " सोहम समीरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला...समीरने किंचित रागाने त्याच्याकडे पाहिले..सोहमच्या चेहऱ्यावर मात्र हास्य पसरले...समीरने मोबाईल फोन खिशात ठेवत त्याच्या कारच्या बोनेटवर डावा हात टेकवत उभा राहून एक निश्वास टाकला..

" चल रे सगळे तुझी वाट बघताय , अंकिताच्या वाढदिवसाचा प्लॅन खराब करू नको..." सोहम खोट्या नाराजीच्या स्वरात म्हणाला..

" तुम्ही जा , माझा मूड नाहीये " समीर

" अरे चल रे , पार्टीनंतर तुझा मूड चांगला होईल " सोहम समीरला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

" मी बोललो एकदा मला नाही यायचंय....मला एकटा राहूदे " समीर मात्र ऐकण्याच्या स्थितीत नव्हता..

" तुला आपल्या दोस्तीची शप्पथ...चल " सोहम अजूनही त्याला सोडायला तयार नव्हता.

" मी नाही येणार....आपली मैत्री गेली खड्डयात...आणि तू पण गेला उडत...मला त्रास नको देऊ..." समीर रागाने फणफणत कारमध्ये बसला आणि कार चालू केली...सोहम सुद्धा त्याच्या अशा वागण्याने संतापला.. मात्र त्यावर काहीच प्रतिक्रिया न देता सोहम त्याच्या जाणाऱ्या कारकडे बघत राहिला.

" सोहम...." लांब उभ्या असणाऱ्या त्याच्या इतर मित्रांनी त्याला आवाज दिला..सोहम त्यांच्याकडे जाऊ लागला...

" काय झालं या सोहमला...हा एवढा का संतापलेला दिसतोय..." कौशल चालत येणाऱ्या सोहमकडे बघत म्हणाला.

" काहीतरी गडबड झालेली दिसतेय " रुचिरा सोहमकडे बघत म्हणाली..

" काय रे सोहम....समीर का निघून गेला ? आणि तुझ्या तोंडावर का बारा वाजलेत ? " नमिता म्हणाली..

" काही नाही रे , समीरच तर माहीतच आहे..छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायची सवय आहे त्याला.." सोहम नाराजीच्या स्वरात म्हणाला..

" जुनेजा काय बोलला त्याला ? " मनोज म्हणाला..

" मागच्या टेस्टमधे सोहम फेल झाला केमिस्ट्री मध्ये त्याच्यावरूनच.." सोहम मनोजकडे बघत म्हणाला..

" जाऊदे रे होईल तो चांगला उद्यापर्यंत....आपण तर मदत पार्टी करु...." सचिन नेहमीसारखा काही घेणं देणं नसल्यासारखा बोलला.

" ठीक आहे चला मग....अंकिता आज मस्त बिर्याणी खाऊ घालेन...." कौशल हसत अंकिताकडे बघत म्हणाला.

" हा हा चला तुम्हाला कव्वा बिर्याणी खाऊ घालते..." अंकिता गमतीने म्हणाली..तसे सगळे हसू लागले.

" ते काय खायचं ते हॉटेलमध्ये जाऊनच बघू , पण आता लवकर चला नाहीतर उशीर होईल " मनोज हातातील रोलेक्स घड्याळाकडे बघत म्हणाला..

" हा चला " सोहम सर्वांकडे बघत म्हणाला....आणि ते सोहम , मनोज आणि कौशलच्या बाईक्सवर निघून गेले..

समीर कार घेऊन ' भारद्वाज हाऊस ' मध्ये शिरला...दरवाजाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या पार्किंगमध्ये कार लावून....तो दारावरची बेल वाजवणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला...त्याने खिशातून वाजणारा आयफोन काढून पाहिले....सोनाक्षी....स्क्रीनवर नाव झळकत होते. त्याने नाखुषीनेच फोन उचलला.

" हॅलो " पालिकडून सोनाक्षी बोलत होती.

" हॅलो , बोल " समीर चिडून बोलत होता. सोनाक्षीच्या ते लगेच लक्षात आले..

" अरे मला तू नवीन पीसी गेम देणार होता ना ? कधी देतोय ? " सोनाक्षी म्हणाली..तिचे बोलणे ऐकून समीर ताडकला.

" इथे माझं काय चाललंय आणि तुला गेमचे पडलेय...तू आता फोन ठेव...नाहीतर मी काही चुकीचं बोलून बसेल.." समीर रागाने खेकसलाच..सोनाक्षीला मात्र समजले की समीरने पुन्हा पेपरमधील मार्क्सवरून सरांचे बोलणे खाल्ले असावेत..तिने लगेच कॉल कट केला..समीर मात्र रागाने धुसमुसत होता.. तो दारावरची बेल न वाजवता उजव्या बाजूला असणाऱ्या बाकड्यावर जाऊन बसला...जाताना त्याने दरवाजशेजारी असणाऱ्या खिडकीवर नजर टाकली...कडाक्याची थंडी असल्याने इ बंदच होती...समीर बाकड्यावर मागे डोके टेकून वर आकाशात पाहत निवांत बसला. पप्पा घरी असतील का ? असा प्रश्न त्याच्या डोक्यात येताच त्याने पार्किंग कडे नजर टाकली..त्याला त्याच्या पप्पांची कार दिसली..जी त्याच्या कारजवळच उभी होती...गाडी पार्क करताना विचाराच्या तंद्रीत असल्याने त्याचे याकडे लक्षच गेले नव्हते...पार्किंगवरून नजर हटवून तो पुन्हा वर आकाशाकडे पाहू लागला..निरभ्र चांदण्यांनी भरलेले आकाश त्याला एका सोबत्यासारखे भासत होते..जणू चमकणारे चांदणे त्याला काहीतरी सांगत असावे असा त्याला भास झाला..जोरात वाहणाऱ्या वाऱ्याने त्याला मंत्रमुग्ध करून टाकले...त्याच्या नकळत त्याचे डोळे झाकले गेले...तो विचारांच्या तंद्रीतच निसर्गाच्या सान्निध्यात झोपी गेला.

" पप्पा नका मारू त्याला...! " समीरची बहीण जोरात ओरडत होती.." साला , एवढ्या मोठ्या घड्याळ कंपनीचा मालक याचा बाप असून याला अक्कल नाही...फेल झालाच कसा ह***र...उद्या पासून याला गाडी , पैसे काहीच मिळणार नाही...मर तसाच साल्या..." समीरचे वडील त्याला बेल्टने जोरजोरात मारत रागाने बडबडत होते..

" अहो थांबा , खूप झाले आता तुमचे..." समीरची आई त्याच्या वडिलांना समिरपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत म्हणाली..मात्र समीरचे वडील ऐकायला तयार नव्हते..समीरच्या आईने त्यांना कसेबसे समिरपासून दूर केले..

" मर तसाच साल्या..." समीरच्या वडीलांनी हातातला बेल्ट जोरात जमिनीवर फेकला...आणि मधल्या रूममध्ये निघून गेले. समीरच्या आईने पटकन जवळ जात समीरचे डोकं हातात घेऊन आपल्या छातीला कवटाळले..समीरची बहीण देखील त्याच्या जवळ जाऊन बसली..समीरच्या चेहऱ्यावर बेल्टने मारलेले निशाण स्पष्ट उमटलेले दिसत होते..त्याच्या डोळ्यात प्रचंड राग दिसून येत होता..तो त्याच्या आईला काहीतरी बोलणार इतक्यात.....

समीरला त्याच्या आयफोनच्या रिंगटोनने जाग आली...त्याचे शरीर कडाक्याच्या थंडीत सुद्धा घामाने थबथबले....तो उठून आजूबाजूला पाहू लागला..तो बाकड्यावर बसलेला होता...आता आपण काय पाहिले ? स्वप्न ? आता आपण पाहिलेला प्रसंग स्वप्न होते की सत्य ? त्याला काही कळेनासे झाले...तो भानावर येइपर्यंत त्याचा फोन वाजवायचा बंद झाला...त्याने हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसत खिशातून फोन काढला..त्याच्या बहिणीचा मिस्डकॉल होता...थोडावेळ बाकड्यावर शांतपणे बसत तो उठला..आणि दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिला...मात्र त्याचे का माहीत नाही, पण बेल वाजवण्याचे धाडस होत नव्हते..पप्पा काय बोलतील ? जुनेजा सरने पप्पांना फोन तर केला नसेल ना ? आता पाहिलेले स्वप्न खर तर नाही ना होणार ? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात सुरू होते....विचारांच्या तंद्रीतच त्याने थरथरत्या हाताने बेल वाजवली...काही वेळाने दार उघडले गेले..समोर त्याची बहीण सुनिधी दारात उभी होती...समीरला बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले...समीरच्या चेहऱ्यावर मात्र कसलेच हावभाव नव्हते...तो तिच्याकडे न बघताच मध्ये येत त्याच्या रूममध्ये निघून गेला..काही तरी झाले आहे हे सुनिधीच्या लक्षात आले...मात्र ती काहीही न बोलता किचनमध्ये निघून गेली..किचनमध्ये समीरची आणि सुनिधीची आई कविता जेवणाची तयारी करत होती. सुनिधी आईला मदत करू लागली.

" आला समीर ? " कविताने काम करता करता विचारले.

" हो आला..पण..." सुनिधी अर्धवट वाक्य बोलली..

" पण काय ? काय झालं ? " कविताने हातातले काम थांबवत सुनिधिकडे बघत विचारले.

" दादा थोडा नाराज वाटला..नक्की काहीतरी झाले असावे ...." सुनिधी गंभीर आवाजात बोलत होती..

" हम्म , फेल झाला असेल परत...फक्त...हे त्याच्या पप्पांना समजायला नको...नाहीतर..." कविताला वाक्य पूर्ण केले गेले नाही.

" हम्म , त्याचीच भीती आहे.." सुनिधी बोलून पुन्हा काम करू लागली.

समीर फ्रेश होऊन त्याच्या रूममधल्या बाथरूममधून केसांवरून हात फिरवत बाहेर आला...तो अजूनही चिंतेत होता...जर पप्पांना आपल्या रिझल्ट बद्दल कळले तर आपले काही खरे नाही , हे त्याला चांगलेच माहिती होते. विचारांच्या तंद्रीतच तो बेडवर बसला..जवळ पडलेला मोबाईल हातात घेऊन स्क्रोल करू लागला.

" समीर जेवण तयार आहे...लवकर ये...." कविताने समीरला आवाज दिला. आवाज ऐकताच समीरने फोन बाजूला ठेवला...आणि नाइच्छेने रुमबाहेर पडला..दबक्या पावलाने चालत तो किचनजवळ येऊन तसाच थांबला..त्याचे आई बाबा काय बोलतात हे त्याच्या कानी पडत होते...मात्र समीरच्या अपेक्षेविरुद्ध त्याचे वडील (पुनीत) हसून चेष्टा मस्करीत बोलत होते..त्यांचे बोलणे ऐकून समीरच्या जीवात जीव आला मात्र त्याला आश्चर्यही वाटले..तो किचनमध्ये आला..डायनिंग टेबलवर सगळे त्याची वाट बघत बसलेले होते..समीरने घाबरतच त्याच्या वडिलांकडे पाहिले...त्याचे वडील हसत त्याच्याकडे बघत होते.

" ये समीर बस " त्याच्या वडिलांनी हसऱ्या चेहऱ्याने त्याला बसण्यास सांगितले..समीर खुर्ची सरकवून त्याच्या नेहमीच्या जागेवर बसला.

" आज मी जाम खुश आहे...आज तर शक्य नाही , पण नंतर नक्की तुम्हाला पार्टी देईन " समीरचे वडील पुनित रम च्या बाटलीने ग्लास भरत म्हणाले.

" का बाबा ? कंपनी बद्दल काही आहे का ? " सुनिधीने जेवण चालू ठेवत समोर बसलेल्या पुनीतकडे बघत विचारले..

" येस बेटा...आज माझ्या कंपनीने खूप महत्वाची डील केली आहे.. " पुनीत रमचा एक घोट घेत म्हणाला..

" आणि अजून एक उद्या मनीष मामाने सुर्यनगरला बोलावले आहे.. " कविता उत्साहीत होत म्हणाली..

" अरे वा....मग तर आपण उद्याच तिकडे जाऊ....अस पण उद्या रविवारच आहे " सुनिधी म्हणाली.

" उद्या तर मला नाही जमणार बाळा , माझी उद्या मिटिंग आहे " पुनीत शेवटचा घोट घेत म्हणाला..

" नाही पप्पा , मिटिंग तर नेहमीच असते...पण आपण आपले जुने घर इतक्या दिवसांनंतर मामाकडे जाणार आहोत...खूप मज्जा येईल..." सुनिधी पुनीतला समजावण्याचा प्रयत्न करत होती.

पुनीत काही बोलणार तेवढ्यात त्याची नजर समीर वर पडली...समीर आल्यापासून एक शब्दही बोलला नाही , हे पुनीतच्या लक्षात आले.

" समीर...काय झालं आज इतका शांत का " पुनीत शांत बसणाऱ्या समीरकडे बघत म्हणाला.

" क...काही नाही...असच..मी तुमचं बोलणं ऐकतोय " समीर अडखळत बोलला.

" समीर , तू ही येशील ना उद्या सुर्यनगरला ? " कविताने समीरकडे बघत विचारले.

" हो...म्हणजे बघेल..." समीर अजूनही अडखळत बोलत होता.

" बघेल म्हणजे ? दादा , पप्पा नाही म्हणताय आता तू पण नाही म्हणू नकोस " सुनिधी रागात म्हणाली.

" तुम्ही जा...पण मला नाही जमणार..." पुनीत जेवण करता करता म्हणाला.

" नाही नाही..पप्पा तुम्ही सुद्धा या " सुनिधी रागात ओरडली.

" तुला समजत नाही का सुनिधी....माझी उद्या महत्वाची मिटिंग आहे... " पुनीत आता ओरडत म्हणाला.

" ठीक आहे मग...नका येऊ तुम्ही...पण माझ्या वाढदिवसाला तुम्हाला तिकडेच पार्टी द्यावी लागेल..आणि तेही मी सांगेल तशी..." सुनिधी नाराजीने म्हणाली.

" ओके , नो प्रॉब्लेम..." पुनीत हसत म्हणाला..

" हो , सुनिधी चा वाढदिवस पुढच्या महिन्यातच तर आहे.." बराच वेळ शांत असणारा समीर जेवण चालू ठेवत बोलला.

" नक्कीच " पुनीत म्हणाला.

" आणि तोपर्यंत माझी कंपनी भारतातील टॉपची कंपनी सुद्धा बनेल...याची मला खात्री आहे...RSB वॉच कंपनी ही कंपनी नाही ब्रँड बनेल..." पुनित आत्मविश्वासाने बोलत होता.

" आपण उद्या सकाळीच निघू , मनीष दादाने ( मामा ) लवकर बोलावले आहे.." कविता पुन्हा मूळ विषयावर येत म्हणाली.

" हो आणि वाटलं तर मुक्कामी राहू त्याच्याकडे..." सुनिधी म्हणाली.

" अरे वा....म्हणजे मनीष मामा झाल्याची सुद्धा पार्टी देणार..." सुनिधी उत्साहाने म्हणाली..

" म्हणजे उद्या मामाच्या हातचे जेवायला मिळणार...हिच्या रोजच्या बोरिंग जेवणापेक्षा बरेच..." समीर सुनिधिकडे हात करत हसत म्हणाला..

" बोरिंग ? मग जेवतोच कशाला मी केलेलं.." सुनिधी लटक्या रागात म्हणाली...समीर मात्र हसतच होता...मघाशी पडलेले स्वप्न आणि जुनेज सरांनी त्याला दिलेले बोलणे तो जवळजवळ विसरलाच होता.

" अरे भांडण बंद करा , पण आता पटकन जेवण आटोपून उद्याची तयारी करा.." कविता दोघांकडे बघत म्हणाली.

" आणि तुमची मिटिंग कधी आहे ? जर जमलं तर तुम्हीही या मनिषकडे..." कविता पुनीतकडे बघत म्हणाली..

" जमलं तर बघेल...माझी मिटिंग दुपारी आहे..जर संध्याकाळी काही काम नसेल....तर येईल.." पुनित म्हणाला.

" ठीक आहे...मी माझी तयारी करते...काय घ्यायच ते बघते.." सुनिधी जेवण संपवत म्हणाली.

" पण आपल्याला सकाळी 7 वाजेपर्यंत निघायला पाहिजे...म्हणजे 9 पर्यंत पोहोचता येईल..." समीर सुनिधी आणि कविताकडे पाहत म्हणाला.

" एवढ्या लवकर ?......अं....पण ठीक आहे " सुनिधी म्हणाली.

" मग तू झोपून रहा...नको येऊ " समीर गमतीने म्हणाला.

" मी येणार म्हणजे येणार...भलेही 5 वाजता का उठायला लागेना..." एवढं बोलून सुनिधी हात धुवायला गेली..

" समीर , तू फक्त गाडी नीट चालव...नाहीतर मागच्या वेळेस सारखा कुठे धडकला तर परत गाडी मिळणार नाही..हे लक्षात ठेव.. " पुनीत मोठ्या आवाजात समीरकडे बघत म्हणाला.

" हो " समीर पुनीतच्या नजरेला नजर न मिळवता म्हणाला..आणि उठून हात धुवायला गेला..पुनीत आणि कविताचे जेवण चालूच होते..काही वेळ शांततेत गेल्यावर कविता बोलली..

" पण मी काय म्हणते...ते घर विक्रम आपल्याला द्यायला तयार कसा झाला ? इतक्या दिवस तर तो नाही म्हणत होता..." कविताने पुनीतला प्रश्न केला.

कविताचा प्रश्न ऐकून पुनीतच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पसरले. बराच वेळ पुनित काहीच बोलला नाही.

" त्याच्याशी तुला काय घेणं आहे ? आपले घर आपल्याला परत मिळाले याचा एन्जॉय कर..." पुनीत तिरस्काराने म्हणाला..पुनीत आपल्याला काही सांगणार नाही हे कविताला समजले...ती पुढे काही न बोलता निघून गेली..

समीर हात धुवून पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आला..सुनिधी बाऊलमध्ये आईस्क्रीम घेऊन खात होती..

" एकटीच खा....आम्हाला विचारू नका..." समीर तिला खिजवत म्हणाला..

" थांब देते " म्हणत सुनिधी समीरला आईस्क्रीम देऊ लागली..समीर फिल्टरच्या पाण्याने ग्लास भरताना गाणे गुणगुणत होता..मघाशी उदास असणारा समीर आता चांगल्या मूडमध्ये आहे , याचे सुनिधीला बरे वाटले.

" दादा....तू आज नाराज का होता ? " सुनिधी समीरला आईस्क्रीमचा बाउल हातात देत म्हणाली..तिच्या प्रश्नावर समीरचा चेहरा उतरला.

" काही नाही....असंच " समीर तिच्यापासून नजर चोरत म्हणाला..

" अरे सांग ना नक्की काय झालंय ? " सुनिधी त्याला सांगण्यासाठी फोर्स करू लागली.

" एकदा सांगितलं ना काही नाही....समजत नाही की तुला...." समीर सुनिधीवर जोरात ओरडला..त्याने हातातले आईस्क्रीमही ठेऊन दिले...तेवढ्यात तिथे कविता आली..

" काय झालं समीर , तु ओरडत का आहे ? " कविता दोघांकडे बघत म्हणाली..

" आई , मी दादाला फक्त एवढेच विचारले की , तो आल्यावर नाराज का होता....त्याला नसेल सांगायचे तर जाऊदे...." सुनिधी शांततेत म्हणाली..

" पण हिला काय करायचंय ? माझं मी बघेल ना.." समीर रागाने बोलला..कविताने त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

" समीर , काय झालं आहे सांग , रिझल्ट चांगला नाही आला का ? " कविताने समीरला शांतपणे विचारले. समीरच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर उमटली..कविताला समजले.

" टेन्शन नको घेऊ , कोणीही पप्पांना काहीही सांगणार नाही...वाटलं तर तुझ्या सरांशी मी बोलेल उद्या..." कविता त्याला धीर देत म्हणाली.

" काही फायदा नाही मम्मी , जुनेजा सर काहीही झालं तर उद्या परवा पप्पांना बोलणारच....आणि नेहमीसारखं मला बोलणे खावे लागणार..." समीर दुःखी स्वरात म्हणाला.

" मी बोलेन तुझ्या पप्पांशी....तू काळजी करु नको " कविता त्याच्या खांद्यावरचा हात काढत म्हणाली.

" दादा , ते सगळं सोड...पण आता उद्याची तयारी करायला चल.." सुनिधी त्याचे लक्ष वळवण्यासाठी म्हणाली.

" हम्म " म्हणत समीर सुनिधीसोबत निघून गेला..कवीता मात्र कसल्यातरी विचारात पडली.

सुनिधी आपल्या रूममध्ये निघून गेली..समीर तिच्या मागून येऊन आपल्या रूममध्ये जाणार तेवढ्यात....त्याच्या कानावर पुनीतचे बोलणे पडले...पुनीत कोणाबरोबर तरी फोनवर बोलत होता.

" हो...उद्या संध्याकाळी या तुम्ही....मस्त एन्जॉय करू..." पुनीत फोनवर मोठ्याने हसत म्हणाला...समीरच्या काय ते लक्षात आले...पुनीतच्या महिन्यातून एकदा दोनदा अशा पार्ट्या होत असतात हे समीरला माहीत होते..तो काही लक्ष न देता आपल्या रूममध्ये गेला..समीर रूममध्ये जाऊन बेडवर बसला..शेजारी त्याचा फोन पडलेला होता..त्याची नोटेफिकेशन लाईट चमकताना त्याला दिसला..त्याने मोबाईल हातात घेऊन पाहिले..काही व्हाट्सअप्प मेसेजेस आणि सोहमचे तीन मिस्ड कॉल..त्याने लॉक उघडत सोहमला कॉल लावला..तीन रिंग नंतर सोहमने कॉल उचलला.

" हॅलो..बोल " समीर म्हणाला..

" काय यार , आता फोन पण नको उचलू " सोहम नाराजीने म्हणाला..

" अरे जेवण चालू होते..बोल...आणि त्या जुनेजाबद्दल सोडून काही बोलणार असशील तरच बोल " समीर म्हणाला.

" तू असा नाराज होऊन निघून गेला....म्हणून तुझा मूड चांगला झाला की नाही ते बघायला फोन केला.." सोहम तोंडात काहीतरी चावत बोलत होता..

" हम्म , सध्यातरी ठीक आहे...पप्पांना काही माहीत नाही अजून.." समीर म्हणाला.

" चल ठीक आहे मग..उद्या जाऊ कुठेतरी बाहेर फिरायला..सगळे जाऊ.." सोहम उत्साहात म्हणाला.

" मी नाही येऊ शकणार...मी उद्या सुर्यनगरला चाललो आहे.." समीर त्याला नकार देत म्हणाला.

" पालघरला ? तुझ्या मामाकडे ? " सोहम तोंडात काहीतरि चावत म्हणाला.

" हो...त्यामुळे मला उद्या त्रास देऊ नको...उद्या मस्त मजा करणार आहे मी...तो जुनेजा ही गेला तिकडेच आणि तू पण..." समीर आनंदात बोलत होता.

" मी काय ? " सोहम म्हणाला..

" काही नाही...चल ठेव फोन मला उद्याची तयारी करायची आहे " समीर म्हणाला.

" हो चल बाय " म्हणत सोहमने फोन ठेवला..समीरने हातातला फोन बाजूला ठेवत उद्याची तयारी चालू केली..

इकडे पुनीत आपल्या रूममध्ये आला..खिशातील मोबाईल हातात घेत बेडवर बसला...काहीतरी विचार करत त्याने कोणाला तरी फोन लावला.

काहीवेळाने कविता सर्व कामे आवरून बेडरूममध्ये आली...नेहमीप्रमाणे ती कामे आवरून येईपर्यंत पुनीत झोपलेला होता..कविता आवाज न करता उद्यासाठी आपली बॅग भरू लागली..आपले कपडे भरण्यासाठी तिने कपाट उघडले..कपाट उघडताच ' धप्प ' असा आवाज झाला..पुनीतचे एक जॅकेट खाली पडले होते..कविताने पुनीत आवाजाने जागा तर झाला नाही ना..हे बघण्यासाठी त्याच्याकडे पाहिले..तो मात्र गाढ झोपेत होता..तिने खाली पडलेले जॅकेट उचलले...जॅकेट उचलताना त्याच्या खिशातून एक कागद खाली पडलेला तिला दिसला..तिने जॅकेट व्यवस्थित ठेऊन खाली पडलेला कागद उचलला...एका छोट्या कागदावर काहीतरी लिहिलेले होते..त्या कागदावरचा मजकूर वाचून कविताच्या चेहऱ्यावर हास्य पसरले..तिनेय तो कागद पुन्हा त्या जॅकेटच्या खिशामध्ये ठेवला...आणि आपली बॅग भरू लागली.

दुसरा दिवस

सकाळची वेळ

समीरला अलार्मच्या आवाजाने जाग आली...डोळे किलकिले करून त्याने मोबाईल हातात घेऊन अलार्म बंद केला..आणि आळस देत बेडवर उठून बसला..पुन्हा फोन हातात घेत सोशल मीडियावर अपडेट पाहू लागला..काहीवेळाने त्याच्या रूमच्या दारावर टकटक झाले.." आई आली असावी " असा विचार करून त्याने उठून दार उघडले..त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याची आई कविता समोर होती.

" उठवण्यासाठीच आले होते..लवकर आवरून तयार हो.." कविता म्हणाली.

" हम्म " म्हणत समीरने आळस देत दरवाजा लावला..आणि कपाटातून कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरला.

सुनिधीच्या दारावर टकटक झाले तशी तिला जाग आली..

" सुनिधीSSS उठ...लवकर आवरून तयार हो..." दाराबाहेरून सुनिधीच्या कानावर शब्द पडले...तिने अर्धवट डोळे उघडून फोन हातात घेत स्क्रीनवर वेळ पाहिली.. ' पाच वाजून बारा मिनिटे '...आणि विनितचे व्हाट्सअप्प वर आठ मेसेजेस..सुनिधी आळस देत उठून बेडवर बसली..एक मोठा आळस देत तिने व्हाट्सअप्प वर विनितचे चॅट ओपन केले..मेसेजेस वाचून त्यावर काहीतरी रिप्लाय करत मोबाईल बाजूला ठेवला..आणि ती आवरायला उठली.

हॉलमध्ये पुनीत लॅपटॉपवर काहीतरी काम करत सोफ्यावर बसला होता..सुनिधी तिच्या रूममधून आवरून बाहेर आली..आणि पुनीत समोर सोफ्यावर बसली..तुने एकदा पुनीत कडे पाहिले..तो गंभीरतेने काम करत होता..सुनिधीला काही तरी बोलायचे होते..पण तो कामात असल्यामुळे तिने बोलायचे टाळले...काहीतरी विचार करत तिने खिशातून मोबाईल काढून घेऊन बसली..

काहिवेळाने कविता तेथे आली..तिच्यामगोमाग समीर त्याची आणि कविताची बॅग घेऊन आला..

" चल सुनिधी लवकर निघू , उशीर झाला आहे.." कविता सुनिधिकडे बघत म्हणाली..तिने एकदा पुनीतकडे पाहिले.

तो कामात व्यस्त आहे हे बघून तिने त्याच्याशी बोलायचे टाळले..सुनिधी आतल्या रूममध्ये तिची बॅग घेण्यासाठी गेली..तोपर्यंत कविता बॅगमध्ये काही राहील का ते बघू लागली..

" मम्मी , मी बाहेर गाडी पुसतो..तुम्ही या.." कविताला सांगून समीर बाहेर पडला..

" पप्पा येतो आम्ही..तुम्हीही या मामाकडे..." सुनिधी पुनीतला मागून मिठी मारत म्हणाली.

" हम्म जमलं तर येईल तिकडे.." पुनीत काम करत म्हणाला.

" चल मम्मी , निघुया.." सुनिधी उत्साहित होत म्हणाली.

कविता आणि सुनिधी दोघेही बाहेर पडले.

रजतपूर पोलीस चौकी...बाजूलाच एक हनुमान मंदिर...समोर एक वाचनालय आणि आजूबाजूला चहाची नाश्त्याची छोटीछोटी दुकाने..सकाळची वेळ असल्याने चहा नाश्त्यासाठी गर्दी जमलेली..नवीन वर्षाची सुरुवात असल्याने आजूबाजूला ' नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ' अशा आशयाची कित्येक बॅनर लावण्यात आलेले होते.

पोलीस चौकीसमोर काही हवालदार चहा घेत उन्हात उभे होते..तेवढ्यात त्यांना लांबून बुलेट गाडीचा आवाज ऐकू आला.

" साहेब आले वाटतं.." एक हवालदार चहाचा घोट घेत दुसऱ्या हवालदाराला म्हणाला.

" हम्म , आता बघा पोलीस चौकीतल्या हिरोची एन्ट्री...! " दुसरा हवालदार हसत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर पहिला हवालदारही हसला..आणि लांबून दिसणाऱ्या बुलेटकडे पाहू लागला..लांबूनच बुलेटवर स्वार होऊन एक मध्यम तब्येतीची...देखणी..डॅशिंग..आणि खाकी वर्दीतली एक व्यक्ती येऊन पोलीस चौकीजवळ येऊन थांबली..

" गुड मॉर्निंग सर " दोन्ही हवालदार कडक सॅल्युट ठोकत म्हणाले.

" हम्म गुड मॉर्निंग " ती व्यक्ती गाडीवरून उतरताना स्मितहास्य करत म्हणाली..आणि पोलीस स्टेशनच्या आत गेली.

" ये छोटूssss साहेबांना चहा पाठवून दे..." एक हवालदार दूरवरच्या चहावाल्याला ऑर्डर देत पोलीस चौकीत निघून गेला.

ती व्यक्ती चौकीतील एका केबिनमध्ये शिरली..समोर एक टेबल त्यावर कसल्या तरी फाईल्स...एक लॅपटॉप..आणि एक नेमप्लेट ' पोलीस निरीक्षक अमित सरपोतदार '...

अमित खुर्चीत बसणार तेवढ्यात एक हवालदार आता आला.

" सर , फिल्म डायरेक्टर संजय सोळुंखे आपल्याला भेटण्यास आले आहेत..पाठवू ? " हवालदार अमित कडे बघत म्हणाला. अमित मानेनेच " हो " म्हणाला..

साळुंखे येईपर्यंत अमित टेबलवरील फाईल्स चाळू लागला.

" मे आय कम इन ? " सोळुंखेनी सुटबुटात...डोळ्यावर महागडा गॉगल लावून आणि गळ्यात सोन्याची चेन...अशा पेहरावात येत केबिनचे दार हलकेसे आत ढकलत विचारले.

" येस , या सोळुंखे.." अमित शांत आवाजात म्हणाला..

" प्लिज बसा.." अमित खुर्चीकडे हात दाखवत म्हणाला..

" मिस्टर सरपोतदार...आपल्याला कल्पना असेलच की मी कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आलो आहे ते.." साळुंखे अमित कडे बघत म्हणाले.

" हो नक्कीच...रविश सोळुंखे केस.." अमित शांतपणे हातातील फाईल चालत म्हणाला.

" हाहाहा...फार कमी दिवसात सर्व माहिती घेतलेली दिसतेय आपण मिस्टर सरपोतदार.." साळुंखे किंचितस हसत म्हणाले..

" हम्म ते माझे कामच आहे...प्रत्येक केसच्या मुळासकट जाऊन ती सॉल्व करणे..." अमित फाईल बघताना हळूच मान वर करत साळुंखे कडे बघत म्हणाला..

" आपण आपल्या कामाप्रती फारच निष्ठावान दिसता.." सोळुंखे हसत म्हणाला.

" आपण लवकर मुद्द्यावर याल तर बर होईल.." अमित फाईल बाजूला ठेवत सोळुंखे कडे बघून म्हणाला.

" काय बोलायचे ? आपण एवढे समजदार आहात...समजून घ्या आणि सोडा माझ्या मुलाला..." सोळुंखे अमित च्या डोळ्यात रोखून बघत म्हणाला.

" तो गुन्हेगार नसल्याचे पुरावे द्या लगेच सोडतो.." अमित शांततेत बाजूचा लॅपटॉप चालू करत म्हणाला..

" हे बघा मिस्टर सरपोतदार...आपला जेवढा वर्षाचा पगार असेल त्याच्या दुप्पट मला महिन्याला मिळतात..आणि..."

" आणि काय ? मला लालच देण्याचा प्रयत्न करू नका...मी तुमच्या मुलाला पुराव्याअभावी सोडणार नाही..." अमित सोळुंखेचे वाक्य मधेच तोडत म्हणाला.

" किती घेणार ? दहा लाख की पन्नास लाख ? " सोळुंखे अमितच्या जवळ येत त्याच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला.

" हे बघा सोळुंखे , तुम्ही कितिही लालच देण्याचा प्रयत्न करा...मी फसणार नाही...तुमचा मुलगा गुन्हेगार आहे..एका गरीब शेतकऱ्याची हत्या केलीये त्याने...आणि एका पोलीस इन्स्पेक्टर वर हात टाकणे हा तर त्याहून मोठा गुन्हा...आणि तुम्ही आपल्या पैसा , प्रसिद्धीचा वापर करून त्याला सोडवू बघता...! " अमित रागाने बोलत होता..साळुंखे मात्र अजूनही त्याच्या डोळ्यात रोखून बघत होता..

" मी या पोलीस स्टेशनमध्ये असताना ते शक्य नाही..

" अमित सोळुंखे कडे तुच्छतेने बघत म्हणाला..

" अर्धा तास...अर्ध्या तासात तुम्हाला रविशला सोडावे लागेल..." सोळुंखे दातओठ खात खुर्चीतून उठला..अमित त्याच्याकडे रोखून बघत होता..सोळुंखे त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकून ताडकन निघून गेला.

समीरची गाड़ी एका भल्या मोठ्या आलिशान बंगल्यात प्रवेशली....गेटच्या बाजूलाच एक बोर्ड लावलेला...बुंदेला स्वीट होम.. मनीष बुंदेला...ऑनर ऑफ MB वॉच कंपनी.

समीरने पार्किंगमध्ये गाडी पार्क केली..कविता आणि सुनिधी गाडीतून उतरून दरवाज्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या..सुनिधीने बेल वाजवली...समीर गाडीतून उतरणार तोच त्याचा फोन वाजला..त्याने फोन खिशातून काढून स्क्रीनवर पाहिले..

' मनीष मामा ' त्याने वाजणारा फोन तसाच खिशात ठेवला..आणि दरवाज्याजवळ येऊन उभा राहिला..बेल वाजवून बराच वेळ झाला तरी दार उघडले गेलेले नव्हते..

" मामा दार का उघडत नाहीये ? " सुनिधी वैतागून म्हणाली..कविताने पुढे होत पुन्हा एकदा बेल वाजवली..समीरने खिशातून मोबाईल काढत स्क्रीनवर पाहिले..त्यावर मनीष मामाचे काही मेसेज आलेले..

' अरे गार्डनमध्ये या , मी तिथे आहे ..'

" मामा गार्डन मध्ये बोलावत आहे चला..." समीर मेसेज वाचून म्हणाला.

" मग मध्ये कोण आहे ? दार तर आतून लॉक आहे.." सुनिधी प्रश्नांकित नजरेने बघत म्हणाली..

" ते मामालाच विचार..." कविता सुनिधीला चालण्याचा इशारा करत म्हणाली..

तिघेही चालत बाजूलाच असणाऱ्या गार्डनमध्ये आले..दूरवरून कोणीतरी दोन व्यक्ती खुर्चीवर बसून हसत गप्पा मारताना दिसत होते.

" मामीsss " सुनिधी पळत जाऊन मामीला बिलगली.

" हाहाहा...ये कविता ये..." मनीष मामा खुर्चीतून उठत म्हणाला..समीर आणि कविताने मनीषला मिठी मारली..

" सुनिधी...तूला फक्त मामीचीच आठवण येते वाटत.." मनीष उपहासाने म्हणाला..

" नाही मामा तस नाही..." सुनिधीने मानिषला कडकडून मिठी मारली.

" काय ज्ञानेश्वरी...आम्ही तिकडे बेल वाजवत बसलो आणि तुम्ही इकडे काय करताय..." कविता ज्ञानेश्वरी ( मामी ) ला मिठी मारत म्हणाली..

" अरे आम्ही तुमच्यासाठी काय केलय ते तर बघा..." ज्ञानेश्वरी बाजूच्या छोट्या टेबलकडे हात करत म्हणाली..

सुनिधी पळत त्या टेबलजवळ पोहोचली.. एका मोठ्या ताटात काहीतरी झाकून ठेवलेले होते..तिने ताटावरील झाकण बाजूला केले...ताटात चिकन कबाब ठेवलेले होते...ताटाच्या बाजूला एका बाऊलमध्ये पनीरची भाजी आणि बाजूला रोटी ठेवण्यात आलेली होती..सुनिधीच्या मागोमाग समीरही तेथे पोहोचला..टेबलवरील मेन्यू पाहून त्याच्याही तोंडाला पाणी सुटले..

" अरे वा मामा...सकाळी सकाळी तोंडाला पाणी सुटले...मस्त चुलीवरचे पनीर आणि माझे आवडते कबाब....! " समीर खुश होत म्हणाला..

" अरे ही तर सुरुवात आहे आजचा पूर्ण दिवस बाकी आहे फुल मज्जा करू.." मनीष आपल्या नाईट पँटच्या खिशातून महागडे सिगारेट पाकीट काढत म्हणाला.

ते बघून कविता काहीशी नाराज झाली.

" दादा..ते मज्जा तर करू...पण मला पाहिले सांग तू सिगारेट कधी सोडणार आहे ? " कविता लटक्या रागात म्हणाली..

" काही होत नाही कविता..कम ऑन " मनीष तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला..

" चला नाश्ता करायला बसूया...खूप भूक लागलीये..." सुनिधी पोटाकडे हात दाखवत म्हणाली..

" हा हा चला बसूया , तुम्ही सुरू करा मी सिगारेट नंतर.." मनीष लायटरने सिगारेट पेटवत म्हणाला..पाहिले सिगारेट बाकी नंतर अशी त्याची सवय सर्वांना माहीत होती..त्यामुळे कोणी काहीही न बोलता खाण्याची तयारी करू लागले.

" हॅलो , पोलीस निरीक्षक अमित सरपोतदार बोलतोय " अमीत लँडलाइन्वर बोलत होता..

" मी डीप्युटी कमिशनर सुनील धारप " पलीकडून आवाज आला.

" बोला सर " अमित लक्ष देऊन ऐकू लागला.

" आताच्या आता रविश सोळुंखेला सोडून द्या.." धारप यांनी आदेश दिला.

" का सर ? तो एक गुन्हेगार आहे...त्याच्याविरोधात पुरावे देखील आहेत.." अमित आश्चर्याने म्हणाला.

" ते मला काही सांगू नका सरपोतदार...त्या सोळुंखेच्या दिल्लीपर्यंत राजकीय ओळखी आहेत...जर त्यांच्या मुलाला आपण सोडले नाही , तर तुमचीच नाही तर माझीसुद्धा खुर्ची धोक्यात येईल.." धारप ओरडून बोलत होते..अमितला त्यांच्या आवाजात भीती जाणवत होती.

" सर पण..." अमित अजूनही ऐकायला तयार नव्हता. धारप सारखे प्रामाणिक ऑफिसर अशी ऑर्डर देताय याच्यावर त्याला विश्वास बसत नव्हता..

" पण काय ? सरपोतदार दिलेली ऑर्डर फॉलो करा नाहीतर राजीनामा द्या..." धारप यांनी अमितला धमकीवजा आदेश देऊन फोन ठेवला..

अमित मात्र यावर चांगलाच संतापला..एका गुन्हेगारविरुद्ध पुरावे असूनही त्याला असे सोडून द्यावे..? आणि तेही राजकीय दबावात येऊन हे त्याला पटण्यासारखे नव्हते..डीप्युटी कमिशनर देखील राजकीय दबावाला बाली पडता..आणि गुन्हेगाराला सोडण्यास सांगता...! छे.. ! अशी न्यायव्यवस्था..! अमित मनातून प्रचंड संतापला होता..त्याला न्यायव्यवस्थेचा आणि डीप्युटी कमिशनर धारप यांचा प्रचंड राग आला होता..मात्र त्याला आदेशाविरोधात जाणे परवडणारे नव्हते..जर आपली खुर्ची गेली तर आपल्या कुटुंबाचे काय होईल याची त्याला चिंता सतावत होती.

" कॉन्स्टेबल...रवीश सोळुंखेला सोडून द्या.." बराच वेळ विचार केल्यानंतर अमितने कॉन्स्टेबलला ऑर्डर दिली.

अमितच्या चेहऱ्यावर राग आणि मजबुरी स्पष्ट दिसून येत होती...आपले लक्ष वळवण्यासाठी तो इतर केसच्या फाईल्स चाळू लागला..

काहीवेळाने...

" सर , रविशला सोडले..पण जाताना त्याने या कागदावर काहीतरी लिहून , तुम्हाला देण्यास सांगितले.." कॉन्स्टेबल केबिनच्या आता येत म्हणाला..

अमितने फाईल मधून डोकं काढत वर कॉन्स्टेबलकडे पाहिले..त्याच्या हातात एक रेजिस्टर बुकचा कागद होता.

अमितने कॉन्स्टेबलकडे " दाखव " असा मानेनेच इशारा केला..कॉन्स्टेबलने हातातला कागद अमितला दिला..अमितने त्याला मानेनेच जाण्याचा इशारा केला..कॉन्स्टेबल निघून गेला..अमित कागद उघडून बघणार तोच त्याचा फोन वाजला.. Unknown Number वरून कोणाचा तरी कॉल येत होता..अमितने हातातला कागद बाजूला ठेवत कॉल उचलला.

" हॅलो " अमीत गंभीर आवाजात म्हणाला..

" काय मिस्टर सरपोतदार...म्हणलो नव्हतो..अर्धा तास..! " पलीकडून सोळुंखे कपटी हसत म्हणाला.

अमितला मात्र बोलण्यासाठी काहीही नव्हते..तो फक्त ऐकत होता..

" तुमच्यासारखे दहा पोलिस ताब्यात घेऊ शकतो..समजलं..! ह्या..तुम्ही तर छोटी गोष्ट आहात...आम्ही तर डिप्युटी कमिशनरला खिशात घातले.." सोळुंखे पुन्हा एकदा मोठ्याने कपटी हसला.

अमितने काहीही न बोलता फोन कट केला..त्याच्या डोळ्यात राग आणि पश्चाताप अशी संमिश्र भावना दिसत होती..मात्र भानावर येत त्याने बाजूला पडलेला कागद उचलला..आणि तो उघडून वाचू लागला..

" शेवटी तुम्हाला मला सोडावेच लागले...काय फायदा आहे तुमचा पोलीस बनून...झुकावे तर आमच्यासारख्या लोकांसमोरच लागते...हीच तुमची लायकी..

                                      - आपलाच रविश सोळुंखे.."

अमितने रागाने कागद चुरगाळून बाजूला फेकला..त्याची लताळपायची आग आता मस्तकात गेली..मात्र त्याने संयम राखत पुन्हा आपल्या कामात लक्ष घातले.

" वा मामा वा...काय चहा बनवला आहे " समीर उत्साहित होत म्हणाला.

" हाहाहा...शेवटी एका मोठ्या वॉच कंपनी मालकाच्या हातचा चहा आहे..चांगला तर असेलच.." मनीष हसत म्हणाला.

" हो..पण शूज कंपनीच्या मालकाला कॉफी येत नाही वाटत.." सुनिधी हातातला कप समोरच्या टेबलवर ठेवत म्हणाली..तिच्या बोलण्यावर सगळेच हसले.

" हे मात्र खरं आहे..दादाला दहा वर्षांपूर्वी मी कॉफी बनवायला शिकवली होती..मात्र त्याला अजूनही जमलेली नाही.." कविता मनीषची मजा घेत म्हणाली..पुन्हा सर्व जण हसले.

" मामा आज त्या तलावावर जाऊया..बरेच दिवस झाले त्या तलावावर जाऊन.." समीर मनिषकडे बघत चहाचा एक घोट घेत म्हणाला.

" हो नक्की..." मनीष आनंदाने म्हणाला..

" आणि मंदिरात सुद्धा " सुनिधी उत्साहित होत म्हणाली..

" हो हो नक्कीच पण त्याआधी तुम्हाला सारप्राईस द्यायचे आहे.." ज्ञानेश्वरी समीर आणि सुनिधीकडे बघत म्हणाली..

" कसले सरप्राईज ? " सुनिधी उत्साहित होत म्हणाली..

" तुम्ही अंदाज लावून बघा काय असेल ते.." मनीष शांतपणे म्हणाला..

समीर आणि सुनिधी विचारात पडले..तेवढ्यात सुनिधीला काहीतरी आठवले..

" घरात...घरात कोण आहे ?...मघाशी आम्ही दरवाज्याजवळ गेलो...तेव्हा दार आतून लॉक होते.." सुनिधी मनीषकडे प्रश्नांकित नजरेने बघत होती..

" सुशील दादा...! सुशील दादा आला आहे ? " समीर उत्तेजित होत म्हणाला..सुनिधीच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठे हास्य पसरले..

" खरचं...! सुशील दादा आला आहे..! " सुनिधी आनंदाने जवळजवळ ओरडलीच..

यावर मनीष मोठ्याने हसला.

" चला घरात जाऊया.." ज्ञानेश्वरी म्हणाली.

" हो चला..." समीर म्हणाला.

सर्व जण खुर्चीतून उठून जाऊ लागले..

" कविता..थांब..काही बोलायचं आहे.." मनीष खुर्चीतून उठत म्हणाला..

कविताने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले..

बाकीचे सर्व निघून गेले..मनीष पुन्हा खुर्चीत बसला..

" काय बोलायचेय ? पुन्हा तोच विषय काढणार असशील तर मला नाही बोलायचे.." कविता नाराजीने मनीष च्या शेजारच्या खुर्चीत बसत म्हणाली..

" हम्म , जर आपण बोललो नाही तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही.." मनीष कविताकडे बघत म्हणाला..

" तुला मी खूप वेळा सांगितले होते..की पुनीत सोबत कोणतीही डील करू नकोस..तो वेळ आल्यावर तुलाही जुमानणार नाही.." कविता त्याच्याकडे न बघता म्हणाली..

" मलाही त्याचा पश्चाताप होत आहे कविता..मी तुझं ऐकायला पाहिजे होत.." मनीष पाश्चातापाने बोलत होता.

" का ऐकशील ? तुला तर स्वतःची कंपनी मोठी करण्यातच इंटरेस्ट आहे..कुटुंबाचे काही घेणं नाही..पुनीत पण तसाच आणि तू पण.." कविताच्या आवाजात दुःख जाणवत होते.

" कुटुंबाची काळजी नसते , तर एवढा मोठा लॉस मी झेलला असता ? तुझ्या संसारात काही आडकाठी येऊ नये म्हणून मी पुनीतशी अजूनही संबंध कायम ठेवले आहेत.." मनिषच्या बोलण्यात बहिणीप्रती माया दिसून येत होती.

" माझ्याशी बोलून काही फायदा नाही...जे काही बोलायचे ते पुनीतशी बोल , तो ऐकणार नाही हे मलाही माहिती आहे...तो फार विचित्र माणूस आहे..तो कधी कसा वागेल कोणाला माहीत ? " कविता मनीष कडे बघत म्हणाली..मनीषने मानेनेच तिच्या बोलण्याला सहमती दर्शवली..कविता खुर्चीतून उठून घराकडे गेली..मनीष काहीतरी विचार करत उठून घराकडे चालता झाला.

ज्ञानेश्वरीने लॉक ची चावी फिरवली आणि दार उघडल्याचा आवाज झाला..." दादाssssदादाssss " सुनिधी मोठ्याने ओरडत घरात शिरली..

" अगं थांब तो त्याच्या रूममध्ये असेल..." कविता तिला थांबवत म्हणाली..

तेवढ्यात समोरून सुशील आला..सुनिधीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले..

" दादा " सुनिधीने त्याला कडकडून मिठी मारली.

" कशी आहेस ? तू तर फार मोठी झाली गं.." सुशील सुनिधीला मिठीतून सोडवत म्हणाला..

" मी छान आहे...तू कधी आला ? आणि सांगितले का नाही ? " सुनिधी आनंदात म्हणाली..

" अरे अरे सांगतो..पहिले जरा दम खा...एवढी पळत पळत आली..." सुशील बसण्यास सांगत म्हणाला..ते बोलत असतानाच मनीष आणि कविता आले..

" मी आलोच , तुम्ही बसा " मनीष रूममध्ये निघून गेला..

" काय आत्या कशी आहेस ? समीर..." सुशील समीरला मिठी मारत म्हणाला.

" मी बरी आहे ..पण एवढ्या दिवसांनी लंडन वरून आलाय आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही..." कविता लटक्या रागात म्हणाली..

" अरे मम्मी , दादाला आपल्याला सरप्राईज द्यायचं असेल.." समीर कविताकडे बघून म्हणाला.

" हो मग , पप्पांनी म्हणून तर तुम्हाला बोलवले..." सुशील समीर आणि कविताला बसण्यास सांगत म्हणाला..

" अगं बस " सुशील फोन मध्ये काहीतरी बघत उभ्या असणाऱ्या सुनिधीला म्हणाला.

" अ..हो...एक मिनिट " सुनिधी अडखळत बोलून सोफ्यावर बसली.

समीर , सुशील आणि सुनिधी गप्पा मारत बसले..

" चल कविता , आपण जेवणाची तयारी करूया.." ज्ञानेश्वरी कविताला म्हणाली...आणि दोघी किचनमध्ये निघून गेल्या..

" काहीही करा , पण काशीतरी पुनीत भारद्वाज सीबत डील कॅन्सल करा..मी तुम्हाला त्यापेक्षा अधिक फायदेशीर डील ऑफर करेल.." मनीष फोनवर बोलत होता..

" सर प्लिज समजण्याचा प्रयत्न करा...RSB कंपनीशी डील करून तुमचे भविष्यात नुकसान होऊ शकते..अं..हॅलो...ऐका.." मनीष वाक्य पूर्ण करेपर्यंत फोन कट झाला..." शिट " म्हणत मनीषने दात ओठ खाल्ले..

अमित त्याच्या केबिनमध्ये एका केससंबंधी हवालदारांना काही सूचना देत होता..

" ओके सर " सूचना देऊन झाल्यावर दोन्ही हवालदार कडकडीत सॅल्युट ठोकत म्हणाले आणि केबिनबाहेर निघून गेले..

अमितने घड्याळ पाहिले...दुपारचा दीड वाजून गेला होता..त्याने अजून जेवणही नव्हते केलेले..

तो पोलीस कॅप हातात घेऊन जायला उठला तोच त्याचा फोन वाजला..अमितने फोन हातात घेत लगेच कॉल उचलला..

" हॅलो " अमित म्हणाला..

" जेवायला येतोय ना ? " पालिकडून त्याची पत्नी दिशा बोलत होती.

" हो " म्हणत अमितने फोन कट केला..आणि केबिनबाहेर पडला.

अमित बुलेटवर बसणार तोच त्याची नजर हनुमान मंदिरावर पडली..मंदिरात दर्शन घेऊन मग जावे असा विचार करून तो मंदिराकडे वळला..

रविवार असल्याने हनुमान मंदिरात जास्त गर्दी नव्हती..अमित मोठ्याने घंटा वाजवून गाभाऱ्यात आला..आणि हनुमानासमोर हात जोडून आणि डोळे बंद करून उभा राहिला..तो नक्कीच देवाकडे काहीतरी मागत असणार हे त्याच्या चेहऱ्यावरून समजत होते..डोळे उघडून त्याने एकदा मूर्तीकडे पाहिले..आणि तेथून जाण्यास निघाला..मंदिराच्या आजूबाजूला बघत अमित मंदिराबाहेर जात होता..तितक्यात....त्याला कोणीतरी धडकले...अमितने त्या व्यक्तीला पकडून पडण्यापासून वाचवले..कोणीतरी गरीब व्यक्ती दिसत होती..अंगावरचे कपडे मळलेले आणि काही ठिकाणी फाटलेले..दाढी वाढलेली...डोळ्यावर तुटलेला एक काळा चष्मा लावलेला..आणि हातात एक मोडकी काठी..

अमितने त्या व्यक्तीकडे पाहिले..कदाचित ती दृष्टिहीन असावी असा त्याने अंदाज केला..

" क...कोण ? म..माफ क..करा.." ती व्यक्ती अडखळत म्हणाली..

" असुद्या...माझे लक्ष नव्हते.." अमित त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

ती व्यक्ती हात जोडून अमितसमोर उभी राहिली.

" आपल्याला कुठे जायचंय ? मी तुम्हाला मदत करतो.." अमित त्या अंध व्यक्तीला मदत करण्याच्या हेतूने म्हणाला.

" नाही...मी इथेच...इथेच मंदिरात बसतो..त्या पायरीजवळ.." ती व्यक्ती पायरीच्या विरुद्ध दिशेला हात दाखवत म्हणाली..अमितला समजले..दृष्टिहीन असल्यामुळे ती व्यक्ती केवळ अंदाजाने हात दाखवत होती.

ती व्यक्ती काठीच्या आधाराने मार्ग शोधत पायरीजवळ असलेल्या एका पोत्याच्या तुकड्यावर जाऊन बसली..अमित मात्र त्याच्याकडे बघत काहीतरी विचारात पडला..मात्र लगेच भानावर येत मंदिराबाहेर पडला...आणि बुलेटवर बसून घराकडे निघाला.

" पप्पांना दवाखान्यात कधी न्यायचेय ? " अमित जेवण करता करता म्हणला..

" एक महिन्यानंतर बोलावले होते...पण आता जवळजवळ दोन महिने होत आलेत.." त्याच्या समोर बसलेली त्याची पत्नी दिशा गंभीर आवाजात म्हणाली..

" मी उद्या पैसे देतो..पप्पांना घेऊन डॉक्टरांकडे जाऊन ये.." अमित शांतपणे म्हणाला.

" आणि कुठून आणणार पैसे ? घरातील खर्चाला पैसे नाहीत..आणि दावखान्याला कुठून आणणार ? " दिशा हतबलतेने म्हणाली.

" ते मी बघेल..पण पप्पांचा इलाज महत्वाचा आहे.." अमित ताटात हात धुवत म्हणाला..

" चल येतो...काही काम असेल तर मेसेज कर.." अमित पोलीस कॅप हातात घेत म्हणाला.

" अमित..." दिशा त्याला थांबवत म्हणाली.

अमितने तिच्याकडे पाहिले..तिच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते..अमितने तिच्याजवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवला.

" कसे जगायचे आपण ? पप्पांचा दवाखाना...घरातला खर्च...कसकाय भागेल एवढ्याश्या पगारात.." दिशा रडत होती...अमितने तिला आपल्या छातीशी कवटाळले..दिशा मात्र हुंदके देत रडतच होती.

" सगळं ठीक होईल....धीर सोडू नको.." अमित तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता..तिच्याकडे बघून त्यालाही भरून आले होते...मात्र आपणच खचून चालणार नाही हे त्याला माहित होते..त्याने स्वतःचे अश्रू दाबून ठेवले..

" चल येतो..काळजी करू नको.." अमित दिशाचा चेहरा हातात घेत म्हणाला..तिने त्याच्याकडे विश्वासाने पाहिले..

अमितने पुन्हा तिच्या पाठीवर हात ठेवला..आणि पोलीस कॅप घालून आतल्या खोलीत गेला...आतल्या खोलीत बेडवर त्याचे वडील झोपलेले होते..त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज दिवसोंदिवस कमी होत चालले होते..हातापायावर मास उरले नव्हते..त्यांच्याकडे बघून पुन्हा अमितला भरून आले..मात्र पुन्हा स्वतःला सावरत तो रुमबाहेर पडला.

" चल मामा...शंकराच्या मंदिरात जाऊ..आणि तसेच तलावावर सुद्धा जाऊ..." समीर रुमालाने ओले हात पुसत म्हणाला..

" अरे जाऊ की..जरा वेळ थांब..आताच जेवण झाले आहे.." मनीष सोफ्यावर रेलत म्हणाला..

" हो ना आताशी 3 वाजत आले आहेत...6 वाजता तलावावर मस्तपैकी सुर्यास्ताचा आनंद घेऊ.." सुशील मोबाईल मध्ये टाइम बघत म्हणाला.

" आपण तोपर्यंत गेम खेळूया..समीर दादा , चल...सुशील दादाला हरवून दाखव गेममध्ये.." सुनिधी समीरला आव्हान देत म्हणाली.

" मला चॅलेंज करते...! चल चॅलेंज ऍक्सेप्ट केलं.." समीर आत्मविश्वासाने म्हणाला..

" पप्पा...जायच्या वेळी आम्हला बोलवा...आम्ही जरा टाईमपास करतो.." सुशील मानिषला म्हणाला.

आणि समीर , सुनिधी आणि सुशील आतल्या रूममध्ये निघून गेले.

मनीषने टीव्ही चालू केला..आणि सोफ्यावर आडवा झाला..समोर टीव्ही चालू होता..मात्र त्याचे लक्ष दुसऱ्याच विचारात गुंतले होते. विचार करता करता त्याला नकळत झोप लागली.

" येस सर , ओके..अर्ध्या तासात पोहोचतो " आपल्या टेबल समोर उभ्या असणाऱ्या अमितने फोन खिशात ठेवत पोलिस कॅप हातत घेतली..आणि केबिनबाहेर पडला..

" पाटील , काही अडचण आली तर फोन करून कळवा.." हवालदार पाटीलला सूचना देऊन अमित पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला..आपली बुलेट चालू करत त्याने वाऱ्याच्या दिशेने पळवली.

" मनीष...मनीष उठ..." ज्ञानेश्वरी सोफ्यावर झोपलेल्या मनिषला उठवत म्हणाली..गाढ झोपेत असलेला मनीष दचकून जागा झाला..

" मामा उठ...4 वाजत आलेत...आपल्याला जायचं आहे..." समीर आतल्या रूममधून बाहेर येत म्हणाला.

" दादा , रात्री झोपला नव्हता का ? " बाजूला मोबाईल घेऊन बसलेली कविता म्हणाली.

" हं...रात्री उशीर झाला होता...त्यामुळे.." मनीष आळस देत म्हणाला.

" मी फ्रेश होऊन येतो...तुम्ही सुद्धा तयार व्हा..." मनीष सोफ्यावरून उठत म्हणाला आणि वॉशरूममध्ये निघून गेला.

समीर सोफ्यावर बसणार तोच त्याचा फोन वाजला..त्याने मोबाईल काढून नाव पाहिले आणि काही विचार करून बाहेर आला.

" हॅलो बोल..." समीर चेहऱ्यावर हास्य कोरत म्हणाला..

" कुठे आहेस ? सकाळपासून कॉलची वाट बघतेय.." पलीकडून एका मुलीचा आवाज होता.

" अगं , मामाकडे आलो आहे...त्यामुळे जमलं नाही कॉल करायला.." समीर तिला समजावण्याचा स्वरात म्हणाला.

" ओके , मग आता वेळ आहे की नंतर कॉल करू ?.."

" आता बाहेर चाललो आहे...उद्या रजतपूरला आलो की मग भेटूया.."

" ओके बाय "

" बाय " म्हणत समीरने फोन ठेवला.

अमितची बुलेट शहराबाहेरच्या एका निर्जन रस्त्यावर येऊन थांबली...त्याने बाईकवरून न उतरता आजुबाजूला नजर फिरवली..त्याच्या डाव्या बाजूला काही अंतरावर त्याला पोलीस जीप उभी असलेली दिसली..अमितने पुन्हा बुलेट चालू केली..आणि तो त्या जीप जवळ जाऊन थांबला..जीपमध्ये काही हवालदार आणि डिप्युटी कमिशनर धारप पोलीस गणवेशात बसलेले होते...अमितला बघून ते बाहेर आले..

" सर " अमित कडकडीत सॅल्युट ठोकत त्यांच्यासमोर उभा राहिला..

" हहह " डिप्युटी कमिशनर धारप यांनी मोठा श्वास सोडत जीपच्या बोनेटवर टेकून उभे राहिले..अमित त्यांच्याशेजारी जाऊन उभा राहिला..जीपमध्ये बसलेले हवालदार गाडीबाहेर येऊन उभे राहिले..धारप यांनी त्या हवालदारांना लांब उभे उभे राहण्याचा हाताने इशारा केला..अमित फक्त त्यांच्याकडे बघत होता..हवालदार त्या दोघांपासून लांब जाऊन उभे राहिले..

" सर...मला असे अचानक...आणि तेही इथे..का बोलावले ? " अमित धारप यांच्याकडे बघत म्हणाला.

" अमित सरपोतदार...फार ऐकले होते तुझ्याबद्दल...एक प्रामाणिक अधिकारी...निष्ठावान...कामाप्रती कर्तव्यदक्ष.." धारप अमितच्या खांद्यावर थाप देत म्हणाले.

" आज प्रत्यक्ष प्रचिती सुद्धा आली...आपल्या प्रमाणिकतेची..." धारप अमितकडे बघत म्हणाले.

सकाळी आपल्याला खुर्ची सोडण्याचा धमकीवजा आदेश देणारे धारप आता इतके शांत कसे ? याचे अमितला आश्चर्य वाटले..

" सर...पण रविश सोळुंकेला आपण आशा प्रकारे सोडून देणे आपल्याला कितपत योग्य वाटते ? " अमितने निर्विकारप्रमाणे प्रश्न विचारला.

" अमित...ही तर सुरुवात आहे...मी पोलीस खात्यात गेल्या वीस वर्षांपासून आहे..मी यापेक्षाही कित्येक मोठ्या गुन्हेगारांना नकळत साथ दिली आहे..." धारप अपराधीपणाने म्हणाले..त्यांच्या या वाक्यावर अमित गोंधळला....त्याला विश्वास बसेनासा झाला...

" स...सर म्हणजे ? ..अमितने गोंधळून विचारले.

" हम्म मला माहित होते...तुला विश्वास बसणार नाही..पण हेच खरं आहे.." धारप म्हणाले..

" सर पण आपल्यासारखा प्रामाणिक ऑफिसर...कोणा मोठ्या व्यक्तींच्या दबावाला बळी पडून न्यायव्यवस्थेला धारेवर सोडतो.." अमित बैचेन होत म्हणाला...त्याला धारप यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता..

" सावर स्वतःला...जे काही मी अनुभवलं आहे..कारण माझ्याप्रमाणे तू सुद्धा एक चांगला ऑफिसर बनू शकतोस , यावर मला पूर्ण विश्वास आहे.." धारप पुन्हा अमितच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले..

अमित समोर शून्यात नजर लावून बसला..न्यायव्यवस्थेबद्दल चीड...धारप यांच्याबद्दल आश्चर्य...आणि पोलीस खात आशा प्रकारे दबावाला बळी पडते याबद्दल दुःख अशी संमिश्र भावना त्याच्या मनात घर करत होती..

" जॉन स्टॅलिन...नाव ऐकलेच असेल..." धारप शांतपणे म्हणाले..अमित काहीतरी आठवू लागला..

" दोन वर्षांपूर्वी झालेल्या सीरिअल किलिंग केसमधला महत्वाचा संशयित.." अमित आठवत म्हणाला..

" बरोबर.....त्याच्या विरुद्ध असणारे सर्व पुरावे नष्ट करून त्याला सोडवण्यात माझाच हात होता.." धारप अमितकडे बघत म्हणाले..आता मात्र अमितच्या तोंडून शब्द फुटत नव्हते..धारप जे काही सांगत होते त्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता..

" तेव्हाही मी राजकीय दबावाला बळी पडलो....तुझ्यासारखाच....तुझ्यासारखाच मी याचा प्रचंड विरोध करण्याचा प्रयत्न केला..मात्र...कुटुंबाच्या परिस्थितीसमोर मीही बळी पडलो..अगदी तुझ्यासारखाच...मात्र जसजसा अनुभव येत गेला तसे समजत गेले...की जर या क्षेत्रात असे दबाव झेलावा लागतो आणि असे काही निर्णय सुद्धा घ्यावे लागतात.." धारप बोलून थांबले...त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसून येत होते..अमितने त्यांच्याकडे पाहिले..त्याला काहीप्रमाणात त्यांचे म्हणणे पटलेले होते..मात्र अजूनही त्याच्या मनात बरेच विचार गोंधळ घालत होते..

" सर , पण आपण या सर्वांचा विरोध करू शकतो...जर सर्व पोलीस खत एकत्र आले तर आपण अशा राजकारणी आणि मोठ्या पदांवरील व्यक्तींना धडा शिकवू शकतो...पण यासाठी फक्त विरोध दाखवण्याची हिम्मत पाहिजे...कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा निश्चय आपण केला पाहिजे..आणि जर असे झाले तर आपण या सगळ्याला थांबवू शकतो.." अमित रागाने मात्र संयम राखत बोलत होता.

यावर धारप हलकसं हसले...त्यांनी अमितवर नजर टाकली...त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येत होता..

" तुझ्यामध्ये असणाऱ्या आत्मविश्वास , संयम आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांमुळेच तू माझा आवडता पोलीस ऑफिसर आहेस...पण तुला तुझी विचारशक्ती बदलावी लागेल..." अमितशेजारी उभे असणारे धारप अमितसमोर उभे राहत म्हणाले...अमित मात्र निर्विकारपणे त्यांच्याकडे बघत होता..

" ओके चल....तुला हे सगळं सांगण्यासाठीच तुला इथे बोलावले होते..मला जावं लागेल..तुलाही जायला हवं.." धारप अमितकडे नजर टाकून जीपचे दार उघडून आत बसले...दूरवर बाजूला उभे असलेले हवालदारही जीपमध्ये येऊन बसले..अमित त्याच्या बुलेटवर बसला..आणि काही क्षण जाणाऱ्या जीपकडे बघत बसला..

" हॅलो , कविता "

" बोल पुनीत , येतोय का इकडे ? " कविता मंदिराबाहेर असणाऱ्या बाकड्यावर बसून बोलत होती..बाजूला ज्ञानेश्वरी आणि मनीष बसलेले..

" नाही..मी नाही येतंय.." पुनीत सोफ्यावर रेलून बसत म्हणाला..

" का ? नाही..म्हणजे मिटिंग तर झाली असेल ना ? " कविता पुन्हा त्याला विचारत म्हणाली..

" कविता...मी आज जाम खुश आहे...आज माझ्या कंपनीने सर्वात मोठी डील केली आहे..." पुनीत आनंदाने ओरडत म्हणाला...कविताच्या बाजूला बसलेल्या मनीषच्या कानावर पुनीतचा बारीक आवाज पडला..तसे त्याने रागाने दात ओठ खात मूठ आवळली..

" अरे वा..चांगले झाले की...पण याचा आनंद आपण सोबत साजरी करु , म्हणून तुला यायला सांगत आहे.." कविता मनिष आणि ज्ञानेश्वरीकडे बघत म्हणाली..

" नाही...कविता....तुम्ही तिकडे एन्जॉय करा..आणि मी इकडे माझ्या मित्रांबरोबर..." पुनीत पुन्हा कविताला नाकारत म्हणाला.

" ओके , आम्ही उद्या सकाळी येऊ परत..बाय "

" ओके " पुनीतने फोन कट केला.

" चला मुलांनो...निघुया..." मनीषने दूरवर फोटोशूट करत असणाऱ्या समीर , सुनिधी आणि सुशीलला आवाज दिला..

" हो आलो.." सुशील लांबूनच हात दाखवत ओरडला..

" पुनीत नाही येणार हे मला माहित होते कविता.." मनीष बाकड्यावरून उठत म्हणाला.

" हम्म " म्हणत कविताही बकड्यावरून उठली..

" चला आता तलावावर जाऊया..उशीर होईल परत.." ज्ञानेश्वरी म्हणाली..आणि ते तिथून निघाले.

अमितने बुलेट पोलीस चौकीसमोर लावली..आणि तो मध्ये जाणार तोच...त्याला समोरून दुपारी भेटलेली अंध व्यक्ती समोर दिसली..ती व्यक्ती हातातल्या काठीने रस्त्याच्या कडेला काहीतरी शोधत असल्याची त्याला दिसली...त्याला मदत करण्याच्या हेतूने अमित त्याच्याजवळ गेला..

" काय शोधताय काका ? " अमित त्या व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला.

" कोण ? " त्या व्यक्तीने अमितला हाताने स्पर्श करत विचारले..

" मी तोच...ज्याला आपण सकाळी धडकला होतात.." अमित शांतपणे म्हणाला..

" अं...मी...मी माझे पैसे शोधतोय...इथेच कुठेतरी...." ती व्यक्ती हात दाखवत अडखळत म्हणाली..

तेवढ्यात अमितची नजर त्या अंध व्यक्तीच्या पायाजवळ पडलेल्या शंभर च्या नोटेकडे लक्ष गेले..अमितने ती नोट उचलून त्या व्यक्तीसमोर धरली..

" घ्या तुमची शंभरची नोट.. "

त्या व्यक्तीने अंदाज घेत नोट घेतली..

" आपले फार फार आभार.." ती अंध व्यक्ती हात जोडत म्हणाली..

" हम्म " म्हणत अमितने त्याच्या खांद्यावर हात ठेवला

आणि चौकीकडे जाऊ लागला..

" पोरा..." त्या व्यक्तीने अमितला हाक मारून थांबवले..अमितने मागे बघितले...ती व्यक्ती हातानेच अमितला स्पर्श करू पाहत होती..कदाचित अमित निघून पुढे आला होता याची त्याला कल्पना नसावी..म्हणूनच ती व्यक्ती पुन्हा मंदिराच्या दिशेने जाऊ लागली..अमित पुन्हा त्या व्यक्तीजवळ गेला..

" थांबा.." अमित लगबगीने त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला..

" बोला का आवाज दिलात ? " अमित त्या व्यक्तीकडे बघत म्हणाला..

" पोरा...आज पहिल्यांदा कोणीतरी या आंधळ्या गरिबाला मदत करताना दया जाणवली...आज खूप दिवसांनी कोणीतरी तुझ्यासारखा चांगला माणूस भेटला..जर तुला..त्रास नसेल....तर आपण तिथे बसून बोलूया.." तू अंध व्यक्ती अमितला हात जोडून विनंती करत म्हणाली..अमित मात्र विचारात पडला..ह्यांना आपल्याशी काय बोलायचे असेल ? आणि ह्यांच्या बोलण्यात इतका शुद्धपना कसा ? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येऊ लागले..पण तो लगेच भानावर आला.

" ठीक आहे पण....आपण एकमेकांना ओळखतही नाही...आणि तुम्हाला माझ्याशी काय बोलायचे आहे ? " अमितने त्याच्याकडे बघत प्रश्न विचारला..

" पोरा का ते माहीत नाही..पण तुला भेटून आपलसं वाटतंय , माझं मन मोकळं करायला तूच मला योग्य वाटतो..तुला विनंती करतो पोरा.." ती व्यक्ती पुन्हा हात जोडत म्हणाली..

" ठीक आहे...तिकडे बसूया..." अमित त्या व्यक्तीच्या हाताला धरून जिथे कोणीही बघत नाही अशा ठिकाणी घेऊन गेला..तिथे असलेल्या एका कठड्यावर अमितने त्या व्यक्तीला बसवले..आणि स्वतः त्यांच्याशेजारी बसला..

" बोला बाबा , पाहिले....मी स्वतःची ओळख करून देतो...मी इन्स्पेक्टर अमित सरपोतदार.." अमित त्यांच्याकडे बघत स्वतःची ओळख सांगत म्हणाला.

" इन्स्पेक्टर ? पोरा..म्हणजे..तू या पोलीस चौकीत असतोस ? " त्या व्यक्तीने प्रश्न केला..

" हो " अमित शांतपणे म्हणाला..

" आपण ? आपले नाव काय ? " अमितने प्रश्न केला.

" रघुनाथ पाटील..." ती व्यक्ती हसत म्हणाली..

" मग मी तुम्हाला रघु काका म्हटलं तर चालेल ? " अमित त्यांच्याकडे बघत म्हणाला..

" हाहाहा , चालेल की..." ती व्यक्ती हसत म्हणाली..

" रघु काका , आपण इथे कसे आलात ? आणि अशा अवस्थेत ? " अमितने प्रश्न केला..

या प्रश्नावर रघु काका दुःखी झाले...ते अस्वस्थ झाल्याचे अमितच्या लक्षात आले..

" हह " रघु काकांनी श्वास सोडत बोलायला सुरुवात केली..

" माझ्या मुलाने मला हाकलून दिले पोरा....म्हातारं माणूस म्हटलं तर अडचण होणारच..." रघु काका जड आवाजात म्हणाले..

" हाकलून दिले ? का ? " अमितचा अश्या व्यक्तींबद्दल असणारा राग दिसून येत होता..

" काय सांगायचे..? ज्या मुलाला लहानाचा मोठा केला..उच्चशिक्षित बनवले...तोच मुलगा असा वागतो...तेही आपल्या बायकोच्या म्हणण्यावरून " रघु काका अस्वस्थ होत म्हणाले..

" हे चुकीचे आहे काका...हा तर अपराध आहे..आपल्या आईवडिलांना अस हाकलून देणार्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.." अमित संतापाने म्हणाला..

" आयुष्य असेच असते पोरा...बघ ना...एकेकाळी कॉलेजमध्ये नेहमी प्रथम असणारा विद्यार्थी...आज या मंदिरासमोर बसून भीक मागतोय..." रघु काका जड आवाजात म्हणाले..अमितला मात्र त्यांच्या मुलाचा प्रचंड राग आला होता.

" माफ करा काका...पण तुमच्या मुलाला लाज वाटली पाहिजे... माझ्या हातात असते तर...त्याला कठोर शिक्षा केली असती..." अमित हाताची मूठ जोरात आवळत म्हणाला..त्याच्या डोळ्यांमध्ये संताप स्पष्ट दिसत होता..

काहीवेळ कोणीच काही बोलले नाही.

" चल पोरा...मी जातो आपल्या जागेवर..मला मदत कर.." रघु काका अमितला हाताने स्पर्श करत म्हणाले..

" आपण काही खाल्लय का ? " अमितने काळजीने त्यांना विचारले..

" ह..हो...आता लोक जी भीक देतात त्याच्यावरच राहावं लागतंय.." रघु काका दुःखी होत म्हणाले..

रघु काकांना काहीतरी मदत करावी या हेतूने अमितने पँटच्या मागील खिशातून पाकीट काढले...मात्र पाकीट उघडून बघताच तो निराश झाला...त्याच्याकडे मदत करण्यासाठी काहीही नव्हते..निराश होत त्याने पाकीट पुन्हा खिशात ठेवले..

" चला " अमितने रघु काकांचा हात धरला आणि त्यांना मंदिराच्या पायरीजवळ बसवले..आणि तो पोलीस चौकीच्या दिशेने चालता झाला..

आजूबाजूला हिरवीगार झाडे....समोर स्वच्छ पाण्याचा तलाव...आजूबाजूला थोडीफार गर्दी...तलावातील पाण्यावर नारंगी रंगाची पसरलेली चादर आणि वर अस्ताला जाणारा सूर्य...अशा मनमोहक परिसराचे निरीक्षण करण्यात समीर गढून गेलेला होता..तलावातील पाण्यात पाय टाकून बसण्यात त्याला वेगळीच मजा वाटत होती..

" दादाsss...इकडे ये.. " समीरने आवाज्याच्या दिशेने पाहिले..त्याच्या उजव्या बाजूला सुनिधी त्याला हात दाखवत बोलावत होती..बाकी सगळेजण तिथेच होते..समीर उठून त्यांच्याकडे गेला..

" कणीस खाणार का समीर ? " सुशीलने विचारले..

" हो " समीरने होकार दिला.

" मावशी , अजून एक बनवा " सुशीलने कणीस भाजणाऱ्या बाईला सांगितले..

" एवढ्या दिवसांनी कणीस खाऊन मजा वाटली.." सुशील कणीस खाता खाता म्हणाला.

" हम्म , मग लंडनला तर अस काही मिळतही नसेल.." ज्ञानेश्वरी हातातलं कणीस संपवत म्हणाली..

" अजिबात नाही...पण काही पदार्थ इकडच्या पेक्षाही भारी होते.." सुशील म्हणाला..

" मग ? इंजिनिअरिंग तर झाली...आता पुढे काय करायचंय ते ही ठरव..." मनीष सुशीलकडे बघत म्हणाला..

" माझे तर ठरले आहे...एकदा प्लेसमेंट साठी सेलेक्शन झाले की...मग लाईफ सेट.." सुशील हसत म्हणाला..

" पण दादा..तू आता इंडिया मध्ये राहशील की लंडन मध्ये..? " सुनिधीने सुशीलकडे बघत विचारले..

" त्याचा तर विचार नाही...पण इंडियामध्ये प्लेसमेंटची चांगली ऑफर येईल असं वाटत नाही..सो , युके..." सुशील म्हणाला..

" म्हणजे युकेला जाऊन आम्हाला विसरशील.." समीर गरमागरम कणीस हातात घेत गमतीने म्हणाला..

" अरे नाही नाही..." सुशील हसत म्हणाला..

" चला आता घरी निघुया...थंडी पण वाढेल.." कविता सर्वांकडे बघत म्हणाली..

" नाही...अजून थोडावेळ थांबुया...पूर्ण अंधार पडेपर्यंत थांबुया..." सुनिधी हट्टीपणाने म्हणाली..

" ठीक आहे..थोडावेळ तलावाच्या पाण्यात पाय टाकून बसू.." मनीष म्हणाला..आणि सगळे तलावाच्या दिशेने निघाले..

चालता चालता मधेच समीरचा फोन वाजला..त्याने पटकन हातातले कणीस संपवत खिशातून फोन काढला..

तन्वी...त्याने स्क्रीनवर नाव पाहिले....त्याने समोर पाहिले बाकीचे सगळे तलावावर पोहोचले होते...समोर पुन्हा मागे फिरला..आणि तलावाच्या डाव्या बाजूला एका कोपऱ्यात झाडाखाली जाऊन उभा राहीला..आजूबाजूला कोणी बघत नाही याची खात्री करून तो कॉल उचालायला गेला , मात्र तोपर्यंत कॉल कट झाला..काहीवेळाने तो पुन्हा तन्वीला कॉल लावणार तोच त्याला मनीष मामाचा कॉल आला...त्याने तलावाकडे एक नजर टाकली..सगळेजण अजून तिथेच होते..

" हॅलो समीर , अरे तू कुठे आहे...कुठेच दिसत नाहीये.." मनीष काळजीने बोलत होता.

" मामा मी इकडे डाव्या बाजूला...." समीर वर हात उंचावत म्हणाला..मनीष ने डाव्या बाजूला पाहिले त्याला एका कोपऱ्यात समीर हात उंचावताना दिसला..

" तू तिकडे काय करतोय ? " मनीष मामाने विचारले..

" काही नाही असंच , मित्राचा कॉल आला होता..थोडं महत्वाचे बोलायचे होते , म्हणून इकडे आलो.." समीर म्हणाला..

" ठीक आहे , बोलून झाल्यावर इकडे ये...आपल्याला निघायचे आहे.."

" हो " म्हणत समीरने फोन ठेवला..आणि पुन्हा तन्वी

चा नंबर डायल केला.

" हॅलो , माझा फोन का उचलत नाहीये..." तन्वी पलीकडून रागाने बोलली..

" ओरडू नको...तुला माहीत नाही का मी बाहेर आहे ते....सगळ्यांसमोर फोन नाही उचलू शकत ते.." समीर सुद्धा रागाने बोलला..

" ते जाऊदे , पण तुला एक वाईट बातमी सांगायला फोन केलाय.." तन्वी गंभीर आवाजात म्हणाली..

" कसली बातमी..? " आता समीरही गंभीर झाला..

" जुनेजा सर ने माझ्या घरी फोन करून पेपरपासून तर आपल्याबद्दल सर्व सांगितलं...आणि उद्या कॉलेजमध्ये आपल्या दोघांच्या पॅरेंन्ट्सना घेऊन बोलावले आहे...मला तर खूप टेन्शन येत आहे.. " तन्वी टेन्शनमध्ये म्हणाली..

" म्हणजे माझ्या घरी सुद्धा..." समीर घाबरत म्हणाला..

" नाही..तुझ्या पप्पानी कॉल रिसिव्ह केला नाही असं जुनेजा सर म्हणाले..त्यांनी मला हे सगळं तुला सांगण्यास सांगितले.."

" आता आपले काही खर नाही..आज नाही तर उद्या जुनेजा आपल्याबद्दल माझ्या घरी संगणारच आहे...आणि नंतर काय होईल याचा विचार करूनच टेन्शन येत आहे.." समीर आता पूर्णपणे घाबरला होता..

" आता आपण काहीही करू शकत नाही...जे व्हायला नको होते तेच झाले..शिट.! " तन्वी डोक्याला हात लावत म्हणाली.

" समीरsssचल जायचं आहे.." लांबूनच मनीष मामाने समीरला आवाज दिला..समीरने मनीष मामला ' आलो ' अशी खुण केली..

" चल बाय , बघू काय होईल ते.." समीर काळजीमध्ये दिसत होता..

" हम्म बाय " म्हणत तन्वीने फोन ठेवला..तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट झळकत होते..

मनीषची गाडी बुंदेला होम मध्ये शिरली...मनिष ने त्याची गाडी पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या समीरच्या गाडीशेजारी उभी केली..सगळेजण गाडीतून उतरले..थंडीचे दिवस असल्याने लवकर अंधार पसरलेला होता..सोबतच थंड हवा वाहत होती..

" चला लवकर मध्ये खूप थंडी वाजत आहे.." कविता थंडीने कुडकुडत म्हणाली..

" हम्म चला.." सुशील खिशातून दरवाज्याची चावी काढत म्हणाला..आणि पळत पळत दरवाज्याजवळ पोहोचला..

सुनिधी आणि समीर काहीतरी बोलत होते..तितक्यात सुनिधीचा फोन वाजला..मोबाईल तिच्या हातातच होता..तिने नाव पाहिले...विनीत...

" दादा मी आलेच...मैत्रिणीचा कॉल आहे..." सुनिधी समीरकडे बघत म्हणाली..

" हम्म " समीर मात्र अजूनही वेगळ्याच विचारात होता.

सुनिधी चालत चालत गार्डनमध्ये आली..सगळीकडे अंधार पसरलेला..एका कोपऱ्यात जिथे चूल ठेवली होती..तिथे सुनिधी खुर्ची घेऊन बसली..आणि तिने विनीत ला पुन्हा फोन लावला..

" हॅलो "

" हेल्लो...सुनिधी...काय करतेस ? " पलीकडून विनीतने विचारले..

" अरे मी मामाकडेच आहे...आणि.."

" आजूबाजूला कोणी नाही ना ? .." विनीतने तिला मध्येच थांबवत विचारले..

" नाही...मी बाहेर गार्डनमध्ये आहे..." सुनिधी म्हणाली...

" ओके , परत कधी येणार आहेस , तुला भेटायचे आहे.."

" मी उद्या सकाळी येईल...संध्याकाळी येईल आपल्या कट्ट्यावर " सुनिधी हसत म्हणाली..

" ओके , मग तेव्हाच बोलू...आता ठेवतो...बाय "

" बाय , भेटू उद्या " सुनिधीने फोन ठेवला..कसलातरी विचार करत ती मनातल्या मनात हसत होती.

" हे मनीषचेच काम असेल...साला...मला येडा समजतो..." पुनीत समोरच्या टेबलवर दारूचा ग्लास ठेवत म्हणाला..त्याच्या बाजूला सोफ्यावर अजून दोन व्यक्ती बसलेल्या होत्या..

" येस पुनीत..मला तर त्याच्यावर आधिपासूनच भरोसा नाही...पण तुझ्या नात्यातील असल्याने आपण कधीही त्याच्या कंपनीशी वैर धरले नाही..पण आता योग्य वेळ आहे...MB वॉच कंपनीला मागे पाडण्याची..." त्या दोघांपैकी एक व्यक्ती दारूचा एक घोट घेत म्हणाली..

" बरोबर पुनीत...हीच वेळ आहे..मनीष बुंदेलाला खाली आणण्याची. " दुसरी व्यक्ती बाटलीने ग्लास भरत म्हणाली..

" हम्म , मनीष बुंदेला....बघ...बघ तू कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा मी सर्वात मोठ्या कंपनीशी डील करून दाखवली..." पुनीत वर बघत मोठ्याने म्हणाला..

" आता तुझ्या कंपनीचा काऊंटडाउन सुरू मनीष...." पुनीत शून्यात बघत रागाने म्हणाला..त्याच्या डोळ्यात बदल्याची आग स्पष्ट दिसत होती..

" नाही...मामा , चिटिंग आहे ही.." सुनिधी मोठ्याने ओरडली..

" नो नो नो हा रूल आहे.." मनीष ने हसत स्ट्राइकर हातात घेत म्हणाला..

" बरोबर...हा रूल आहे..तुला काय कळत गं कॅरम मधलं.." समीर सुनिधीच्या डोक्यात टपली मारत म्हणाला..

" दादा.." सुनिधी रागाने ओरडली..

" तुम्ही खेळा..मी तर बोर झालो आता.." सुशील सोफ्यावर रेल म्हणाला..चुकून त्याचा पाय समोर टेबलवर ठेवलेल्या कॅरम बोर्डला लागला..आणि बोर्ड सकट कवड्या देखील खाली पडल्या..

" अरेरे...चला...देवाच्याच मनात नाही आपण अजून खेळावं ते..." मनीष गमतीने म्हणाला.

" बसा जरा...कितीवेळ काम करणार.." मनीष किचनमधून येणाऱ्या कविता आणि ज्ञानेश्वरीला म्हणाला..

दोघीही येऊन सोफ्यावर बसल्या..

" मम्मी , आपण अजून काही दिवस थांबुया ना.." समीर म्हणाला..खरतर त्याला जुनेजा सर चे टेन्शन नको होते...म्हणून त्याची परत जायची इच्छा नव्हती.

" नाही समीर....तुला तर माहीतच आहे..की मामी आणि सुशील उद्या मुंबईला जाणार आहेत...मग आपण थांबून काय करणार ? " कविता समीरला समजावत म्हणाली..

" दादा...मामी..थांबा ना काहीदिवस...मुंबईला नंतर जा.." समीर म्हणाला..

" नो समीर...मला उद्याच जावे लागेल..माझे महत्वाचे काम आहे..आणि मलाही माझ्या मामाला भेटायचे आहे...नंतर मला पुन्हा लंडन ला जावे लागेल.. त्यामुळे उशीर करून चालणार नाही.." सुशील समीरकडे बघत म्हणाला..

" आणि मामा तू काय करणार इथे एकटा...? " सुनिधी मनीष कडे बघत म्हणाली..

" मला खूप काम आहे बाळा..कदाचित या आठवड्यात पुण्यालाही जावे लागू शकते..." मनीष जांभई देत म्हणाला..

" समीर , आपण उद्या सकाळी निघुया...आणि तसे पण तू कॉलेजला आणि सुनिधी शाळेत नाही गेले तरी चालेल.." कविता दोघांकडे बघत हसत म्हणाली..

" हा..मग ठीक आहे...जर इथे कोणी नसेल तर थांबून पण फायदा नाही...आपण उद्याच जाऊ..." सुनिधी म्हणाली..

" सुनिधी मॅडम...दहावीचे वर्ष आहे..जरा अभ्यासकडेही लक्ष द्या.." मनीष हसत म्हणाला..

" आणि तुम्हीही समीर सर...बारावी आहे आपली.." मनीषने हसत समीरकडे पाहिले..समीर मात्र कसाबसा हसला..उद्या काय होईल या विचाराने तो आधीच चिंताग्रस्त झालेला होता.

" चला , उद्या लवकर उठायचे असेल तर आता लवकर झोपा.." ज्ञानेश्वरी सर्वांना म्हणाली..

" हो मम्मी , आपणही यांच्यासंगेच लवकर निघुया मुंबईला..." सुशील जांभई देत म्हणाला.

" हम्म , चला झोपून घ्या आता " ज्ञानेश्वरी सोफ्यावरून उठत म्हणाली..सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले.

अमित जेवण करून घरासमोरील ओट्यावर शून्यात नजर बसलेला होता..समोर गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांचा आवाज त्याच्या कानावर पडत होता..मनात मात्र रघु काकांबद्दल विचार चालू होते..त्यांच्या मुलाने त्यांना असे का सोडून दिले असेल ? रघु काकांची काय चुकी होती , की एवढी मोठी शिक्षा त्यांना मिळाली ? असे एक ना एक प्रश्न त्याच्या डोक्यात चालू होते.

त्याची पत्नी दिशा त्याच्या बाजूला येऊन बसली..विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या अमित भानावर आला..

" काय विचार करतोय ? "

" काही नाही असेच.." अमित तिच्याकडे बघत म्हणाला..

" कधी कधी माझ्या मनात विचार येतो..की मीही काहीतरी काम करावे..कसेतरी पैसे कमवावे..पण.." दिशा दुःखी होत बोलायची थांबली..

" अजिबात नाही...एका छोट्या जिवाशी खेळून कस चालेल..." अमित तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाला..

" जर आपल्या बाळाला काही झाले तर काय करायचे.." अमित काळजीच्या स्वरात म्हणाला.

दिशाने हळूच आपले डोके अमितच्या खांद्यावर ठेवले..आणि समोर खेळणाऱ्या लहान मुलांकडे पाहू लागली..काहीवेळ दोघेही काहीच बोलत नव्हते..दोघांच्याही मनात वेगळे विचार सुरू होते...

" पप्पांना गोळ्या देऊन आले.." दिशा उठून घरात गेली..अमित मात्र पुन्हा शून्यात नजर लावून विचारात गुंतला.

समीर या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होता...त्याला उद्या काय होईल याची भयंकर चिंता सतावत होती..पेपरमध्ये कमी मार्क पडलेले पप्पांना कळाले तर ? आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे माझ्या आणि तन्वी बद्दल जर पप्पांना समजले तर काही खर नाही..! विचारांच्या तंद्रीतच समीर बेडवर उठून बसला....त्याच्या बाजूलाच सुशील दादा झोपलेला होता..एवढ्या थंडीतही त्याला नको त्या विचारांमुळे घाम फुटला होता..त्याने कसेबसे शेजारी ठेवलेल्या बाटलीने त्याने पाणी पिले आणि बेडवर आडवा होत झोपण्याचा प्रयत्न करू लागला..

" कायsss हे क...काय..सांगतोय तू नथुराम...! " कविता मोठ्याने फोनवर ओरडली..तसे सगळे पळत तिच्याजवळ येऊन उभे राहिले...कविता मटकन सोफ्यावर बसली तिच्या हातातून मोबाईल खाली पडला...तिला प्रचंड मोठा धक्का लागला होता..काय झाले कोणालाच कळेना..

" काय झाले कविता...सांग काय झालं ? " मनीष तिला सावरत गोंधळून ओरडत होता..

" प..पुनीत.." कविताच्या डोळ्यातून पाणी आले..सगळेजण घाबरून तिच्याकडे बघत होते..

" पुनीत काय ? " मनीषने घाबरून विचारले..

" पुनीतचा ख...खून झ..." कविताला वाक्य पूर्ण करता आले नाही...हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला..त्यांच्यापायाखालून जमीनच सरकली..

" पुनीतचा....ख...खून....! " मानिष डोक्याला हात लावून मटकन खाली बसला..कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते..सुनिधीने मोठ्याने हंबरडा फोडला..ज्ञानेश्वरीने तिला सावरण्याचा प्रयत्न केला.

अमित सकाळी लवकर पोलीस चौकीत पोहोचला..केबिनमध्ये जाऊन नेहमीप्रमाणे तो आपले काम करू लागला..एक कॉन्स्टेबल चहा घेऊन आला..त्याने चहा टेबलवर ठेवला आणि निघून गेला..

अमित काही फाईल्स चाळत असतानाच एक हवालदार लगबगीने आत आला..

" सर , भारद्वाज हाऊस मध्ये पुनीत भारद्वाज यांची डेड बॉडी सापडली आहे...हत्या झाल्याचा संशय आहे.." हवालदार गंभीर आवाजात म्हणाला..

तसे अमितने हातातील फाईल बाजूला ठेवली आणि ताडकन उठला..

" कोल्हे , सोबत काही हवालदार आणि कॉन्स्टेबल दकबत घ्या आणि ताबडतोब चला..." पोलीस कॅप हातात घेत अमितने हवालदारांना सूचना दिल्या..आणि ताबडतोब बाहेर पडला..

पोलीस जीप भारद्वाज हाऊस बाहेर येऊन थांबली..अमित ताडकन जीपमधून बाहेर पडत आत गेला..हवालदार कोल्हे आणि झोपे त्याच्यामागून आले..

दरवाज्याजवळ एक ज्येष्ठ व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत उभा होता..अमित लगबगीने त्याच्या जवळ गेला..

" डेड बॉडी कुठंय " अमितने त्या व्यक्तीला विचारले..त्या व्यक्तीने थरथरत्या हाताने दरवाज्याकडे हात केला...तसा अमित ताडकन आत घुसला..हॉलमध्ये समोर सोफ्यावर पुनीतची डेड बॉडी पडलेली होती...आजूबाजूला रक्ताचा सडा पडलेला...अमित बॉडी जवळ जाऊन निरीक्षण करू लागला....कोणत्यातरी धारदार शस्त्राने छातीवर वार केल्याच्या खुणा दिसत होत्या..अमित आजूबाजूला काही मिळते का पाहू लागला..

" कोल्हे आजूबाजूला काही मिळते का पहा.." अमितने आदेश दिला..कोल्हे काही कॉन्स्टेबलला घेऊन घरात शोध घेऊ लागला..

अमित निरीक्षण करत असतानाच त्याचा फोन वाजला..त्याने खिशातून फोन काढला..धारप सर..

" हॅलो " अमित गंभीरपणाने म्हणाला..

" अमित...हे बघ...ही केस फार गंभीर वाटते आहे....पुनीत भारद्वाज एक प्रतिष्ठित घड्याळ कंपनीचे मालक आहेत..त्यांच्या हत्येने फार मोठी खळबळ माजू शकते...लवकरात लवकर केस सोडवण्याचा प्रयत्न कर..." धारप यांनी आदेश देत फोन ठेवला..

अमितला समजले की ही केस काही साधी दिसत नाही..ही केस दिसते तेवढी सोपी नसेल...हे अमितच्या लक्षात आले होते...ही केस त्याच्यासाठी एक आव्हान होती..मात्र हे आव्हान पेलायला तो पूर्णपणे तयार होता..

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime