“
तिला पुरणपोळी आवडते म्हणून त्याने आज सकाळी लवकर उठून पुरणपोळी बनवायचा बेत आखला होता. जेवणाच्या ताटात त्याने प्रेमाने वाढलेली पोळी खाताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. आज त्याने खऱ्या अर्थाने बुरसटलेल्या विचारांची होळी करून एक नवीन पायंडा पाडला होता.
”