तिचा पदवीदान समारंभ पाहताना आईचा ऊर आला भरून, वडिलांनी वाजवल्या अभिमानाने टाळ्या जुन्या आठवणी स्मरून. दादा मात्र होता गडबडीत टिपण्या तिची तस्वीर, त्या सर्वांना कडकडून मिठी मारण्या झाली ती अधीर!
देव आहे चराचरात, प्रत्येकाच्या मनात! जितका आहे तबल्याच्या नादात, तितकाच आहे कोकिळेच्या स्वरात ! तो जितका आहे देवळातल्या गाभाऱ्यात, तितकाच आहे तो गरिबाच्या दारात!
राजा असावा रामासारखा जनतेला जपणारा, छत्रपती शिवरायांसारखा स्वराज्यासाठी झटणारा! राणी असावी झाशीच्या लक्ष्मीबाईं सारखी पराक्रमी, जिजाऊंसारखी खंबीर अन् निर्धारी ...!
बाहेर आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल असं वातावरण...अशा वेळी ही पृथ्वी जरा जास्तच मोहक दिसु लागते! ते इंद्रधनुष्य, ती हिरवीगार टेकडी, मातीचा सुगंध या सगळ्या गोष्टी मनात साठवायला लागतो आपण...!
कॉलेजच्या मागच्या रस्त्याने तो प्रेक्षागृहाकडे जाणारा रस्ता तिला आठवला...तो रंगमंच आठवला ! काय नाही दिलं त्या वास्तूने तिला..तिचं अस्तित्व, तिची ओळख आणि त्याहूनही बरंच काही...!