STORYMIRROR

Meera Bahadure

Others Children

4  

Meera Bahadure

Others Children

Z. P शाळा

Z. P शाळा

1 min
322

आठवते मला माझी झेडपीचे शाळा

भिंतीवर लटकणारा तो काळा फळा

पांढऱ्या खडूच्या त्या सुंदर रेषा

त्या शिकवणीच वेगळी होती नशा


शिक्षकांची शिकवणी खुपच छान

अभ्यास नाही झाला की यायचा घाम

झोपेतही आठवायचा सरांचा दरारा

वेळीच व्हायचा अभ्यास पुरा


कविता शिकवताना सर बेधुंद व्हायचे

 दुसऱ्या दिवशी कविता पाठ करून घ्यायचे

कविता होत्या खूपच छान

मायबोलीचा राखत होत्या मान


शाळेच्या खिचडीचा स्वादच मस्त

 दुपारच्या सुट्टीत चा खर्च होता स्वस्त

 शाळेची मैत्री खूपच छान

नेसायचा कुणालाच कशाचा अभिमान

गरीब-श्रीमंत एकत्र यायचे

झेडपीच्या शाळेत सर्व सामावायचे


माझे शिक्षक तर ज्ञानवंत गुणवंत

 त्यामध्ये दिसायचे सारे कलावंत

त्यांनी शिकवले परिश्रमाचे धडे

म्हणूनच वळलो योग्य मार्गाकडे

 त्यांच्या शिकवणीतून मोठे झालो

जीवनाच्या सारी पाठात यशस्वी झालो



Rate this content
Log in