ययाती देवयानी
ययाती देवयानी
ययाति देवयानी या कादम्बरी चा
काव्य रूपी वेध घेण्याचा प्रयत्न
झेलतो फुलांचा भार
गुंफन त्याचा हार
तो बहार ताटव्या चा
मध प्रांशु न तयाचा
अपुट अधीर मी झालो
फुलावर बरसली श्रावण धार
झेलतो फुलांचा भार। 1
तो क्षण यौवनाचा
सतार छेड़ित होता
स्पर्शाने त्या पाना चा
सुगन्ध मोहरत होता
मी हरपलो सप्त स्वराच्या पार
झेलतो फुलांचा बहार। 2
मदमस्त त्या धुंद राती
प्रज्वलित त्या फुलवाती
उद्दीपित होता त्या पण ती
मी बेधुन्द अश्वावर स्वार
झेलतो फुलांचा बहार। 3
एकेक फुलांचा तो रंग
स्वछंद आनन्दी मी दंग
आळ वित आरोह अभंग
मन घेता घेईना माघार। 4
मद्या चे रिचवित प्याले
नसा नसात मदन बहरले
इच्छा पुर्ति चे ते सोहाले
अवनीचे ते सर्वहि चोचले
कवटालुंन त्याचा बहार
हर पाख ल्याची ती पखरण
मी चुम्बियला तो क्षण
नक्षत्रा चे होते देणे
मोकळे स्वर्ग सुखाचे द्वार
झेलतो फुलांचा बहार
