STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

ये ग पोरी माहेराला

ये ग पोरी माहेराला

1 min
249

पिटुकल्या झोपाळ्यावर

 इटुकली चैत्रागौर

 बाजूला नाचतात

 कलिंगडात कोरलेले मोर


तोतापुरी तले राघू 

मिठू मिठू बोलतात

 मिरची खाण्याऐवजी

 कैरी डाळ मागतात


गुढीची साखर माळ

 गळ्यात शोभते

 पाण्यावरची रांगोळी

 पराती मध्ये फुलते


आरास करण्यासाठी

 फुलांच्या परड्या

 समोर ताटामध्ये

 करंज्या आणि कुरडया


 हळदी कुंकवाला 

नटून थटून

सवाष्णी येतात

 कैरी डाळ आणि 

पन्ह्याने तृप्त  होतात


ओल्या फुगाण्याने

 भरायची त्यांची ओटी

 आयुष्य मागायचे

 कुंकवाच्या धन्यासाठी


माहेरवाशिणीचे 

लाड करायचे

 गोड धोड तिला

 खाऊ घालायचे


 हळूच झोका द्यायचा

 हलवायचा तिचा झुला

 आणि म्हणायचे दरवर्षी

 ये ग पोरी माहेराला


Rate this content
Log in