व्यवस्था
व्यवस्था
1 min
460
व्यवस्थेच्या विरोधात
आपले नेहमीच रडगाणे ;
बेहिशेबी नियमांनी
बनले कायदे लाजिरवाणे.
व्यवस्थेत चांगल्या माणसांचे
कुजवून करतात खत ;
एकट्याला एकांतात गाठून
केले जातेय 'पानिपत'.
व्यवस्था नामक पद्धतीला
कधीच बदल नको असतो ;
"पैसा फेको, तमाशा देखो"
व्यवस्थेचा स्वभाव असतो.
पैसा फेकला की हवी
तशी व्यवस्था नाचते ;
प्रामाणिकता व सच्चाई
आपली आपल्यालाच बोचते.
दुर्लक्ष- तडजोडीचे मार्ग
आपण सर्वच धरतो ;
व्यवस्थेला शिस्त लावणारा
खरा 'लोकनायक' ठरतो.
लोकशाहीच्या हितासाठी
व्यवस्था काम करते ;
भ्रष्टाचाराला थारा देऊन
सर्वसामान्यांना जिवंत मारते.
