STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

व्यथा माझ्या बापाची

व्यथा माझ्या बापाची

1 min
317

शेतकरी माझा बाप

राब राब राबतुया

उन्हातान्हातून जातं

नांगरणी करतुया    (1)


निढळाचा घाम गाळी

तेव्हा बी पेरले जाई

पावसाने हूल देता

मन धसकून जाई   (2)


पोराबाळांसाठी आहे

तोच आमचा पोशिंदा

मायसाठी सर्वस्वचि

धनी तो जन्मोजन्मीचा  (3)


कधी ओला कधी सुका

दुष्काळच पाचवीला

कर्ज फेडायचे कसे?

चिंता जाळते उराला   (4)


आम्ही सारे मदतीला

नको गड्यांची मिजास

सोनं पिकवू भूमीत

देतो बापाला विश्वास   (5)


शेतकरी माझा बाप ह्या विषयावरील व्यथा माझ्या बापाची ही कविता स्वरचित असून संपूर्ण , अंशतः अनुवादित किंवा चौर्य नाही



Rate this content
Log in