व्यर्थ प्रयत्न
व्यर्थ प्रयत्न
1 min
375
व्यर्थ प्रयत्न करू नकोस
विचार कोणाचे बदलत नसतात
स्वतःची इच्छा असेल तर लोकं
स्वतःला बदलत असतात .
कशाला सुचवावे काही जर
समोरचा ठेवत नसेल विश्वास
किती ही केला आटापिटा तरी
त्याला नसतो कसलाच ध्यास .
तुझं मात्र मन दुखावत
तुला वेड काही खुणावत
चागंल लवकर घेतलं नाही जात
म्हणून ह्रदय पानवत .
व्यर्थ प्रयत्नांना तुझ्या
नाही कसलीच सिमा
नको होऊस नाराज
बाळग जरा तमा
