व्यक्त व्हा !
व्यक्त व्हा !

1 min

46
व्यक्त व्हा व्यक्त व्हा
नको हा अबोला
घुसमटू नका तुम्ही
व्यक्त व्हा व्यक्त व्हा !
नाही कुणीच भेटले तर
बोला सेल्फी वर
या आरस्या समोर !
व्हा बोलके आणि व्यक्त व्हा !
नको कोंडमारा
करा निचरा
झाडू मारुन काढा
मनातील कचरा !
पण इतकेही नका बोलू
घ्या काळजी मनाची
तुमच्या आमच्या
साऱ्याच मनांची !