वटवृक्ष
वटवृक्ष
1 min
39
आयुष्याचे चढउतार
इथूनच सदा पाहीले
काही क्षण निसटले
काही काळजातच राहीले
फांद्या विस्तारल्या
शेंडा उंच आभाळी गेला
खोलवर रोवता पाय
आज माझा वटवृक्ष झाला
आता स्थिरावलो इथे
सलगी मातीशी झाली
ऊन पावसाची सारी
भिती निघून गेली
पाखरांनी अंगाखांद्यावर
बक्कळ गर्दी केली
पिल्लासी सोडूनी घरट्यात
पाखरे रवाना झाली
