वसंत
वसंत
1 min
578
लीला अजब सृष्टीची
चैत्र पालवी सजली
अलगद वसंतात
वृक्षावरी विसावली
साज लेऊन नवखा
आला बहर वसंता
रवि किरणांची माया
पानातून पाझरता
लाल केशरी फुलांनी
येई फुलून पळस
पर्ण विरहित सारा
वाटे वसंत लोभस
उन्हं तापते आभाळी
चैत्र पालवी नटते
स्वागतास वसंताच्या
गान कोकीळाही गाते
चिंच करवंद सारा
मेवा दुर्मिळ लाभतो
जेव्हा सुष्टीत अजब
सारा वसंत भिनतो
आम्र वृक्षा हा मोहर
धुंद करी आसमंत
मोद भरून रे उरी
येई घेऊन वसंत
