वरुणराजा
वरुणराजा
1 min
236
वैशाखाची काहिल संपून
ज्येष्ठ सुरु जाहला
बिजलीच्या कडकडाटे
मेघराज गर्जला
झरझर झरती श्रावणधारा
तृप्त वसुंधरा
हिरवी वस्त्रे लेऊनी
सज्ज श्रावण स्वागता
रिमझिम रिमझिम श्रावणधारा
तन मन उमलवती
सोनपिवळे ऊन कोवळे
वृक्षराजींमधूनी
कृषीवल हर्षित मानसी
वरुणराज बरसला
पोशिंदा हरितवनाचा
कृपावंत झाला
असाच ये रे हर्षत बरसत
सुखवाया धरणी
जीवन दे बा आम्हां पामरा
आस प्रभूचरणी
