वर्तुळ
वर्तुळ
1 min
414
धावत आला एक बिंदू
पटकन उमटला वहीवर
अनेक बिंदुंची करता ओळ
रेषाखंडच झाला तर...
रेषाखंड वाढला एकीकडून
अन् किरण लागला दिसू
हळूच वाढवला दुसरीकडून
तर रेषा लागली हसू...
दोन रेषा समांतर
जणू रेल्वेचे रूळ
एका बिंदूत छेदणाऱ्या रेषा
म्हणजे अनेक किरणांचे फूल
तीन रेषाखंड जोडून
तयार होतो त्रिकोण
चारांची दोस्ती होता
बनतो एक चौकोन
गोल गोल फिरताना
बिंदूंनी धरले रिंगण
वर्तुळ झाले बघता बघता
अन् भरून गेले अंगण...!
