वर्दळ
वर्दळ
1 min
201
अलीकडे आठवेनाशी झाली
भोवतालीची वर्दळ मोठी
एकटेपणाचा पगडा वाढून
विचारांची जमली दाटी
कलकलाट तो विरला कोठे
पावले कशी अडखळली
माणसांच्या गर्दी मधली
नाती कुठे तडफडली
श्वास कोडंला चारभिंतीत
घालमेल जिवाची थांबेना
दूरवरचा कवडसा उन्हाचा
गोष्ट कानी नवी सांगेना
वाट पाहत थांबावे किती
उद्या होईल का नवी पहाट
वर्दळीतला मोकळा श्वास
दाखवेल जगण्याची नवी वाट
