वनराई
वनराई
1 min
73
एकांत गूढ अंधारलेला
तरीही नसे शातंता इथे
पाखरांच्या दाटीवाटीत
भरलेला संसार जिथे
खेटून उभी वनराई
हाक मारते येताजाता
निसर्गाच्या सानिध्यात
जगा जिवन आता
नियम पाळा जगण्याचे
करू नका वृक्षतोड
झाडे लावा झाडे जगवा
हाच ध्यास असावा गोड
भ्रमंती करा चौफेर
धक्का न लावता
निसर्गाचे देणे लागतो
पहा स्वतः कसे वागता
