वंदन देशसेवकांना
वंदन देशसेवकांना


कोरोनाचे संकट येता
कर्तव्य जीव वाचवणे
सफाईचे महत्त्व जाणूनी
कामगारांचे नित्य झटणे (1)
घर, मुलेबाळे दूर सारुनी
डॉक्टर, परिचारिका झटती
धोका माहित संसर्गाचा तरी
कर्तव्यास ना कधी चुकती (2)
ओघ वाढता रुग्णांचा
नसे कामात ढिलाई
निवृत्त डॉक्टरही पुढती
सेवा परमो धर्म जाणिती (3)
अवैध वाहतूक दिवसा-रात्री
पोलिस त्यांना नित्य अडविती
कामाची विभागणी न माहिती
गरजूंना जेवणही पुरविती (4)
पोलिस हितोपदेश देती
वारंवार समजाविती तरी
कळूनही जिथे वळेना
सौम्य लाठीप्रहार करिती (5)
वंदन समस्त देशसेवकांना
कृतज्ञतापूर्वक आमुचे नमन
कसे सांगू शब्दांमधी सारे?
स्विकारावे नम्र पुर्नवंदन(6)