STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

वळून तू पाहता

वळून तू पाहता

1 min
127

वळून तू पाहता मला

मी रमून जातो स्वप्नात

निरागस हास्य पाहून

तू घर करते या मनात


सदा हसत वदनाने

असते तू स्वतःत धुंद

रूप पाहून तुझे गोड

होतात सारेच बेधुंद


कर्तृत्व तुझे असे ठेव

वाढावी घराची शान 

स्वभावाने प्रेमळ तू

मित्रांची तर आहे जान


अशीच राहावे हसत

हीच प्रार्थना देवाकडे

न यावे जीवनी दुःख

हेच भगवंता साकडे



Rate this content
Log in