वळण विसाव्याचे
वळण विसाव्याचे
1 min
230
जीवनाच्या रंगभूमीवर
दुःखाचे काटे सलल्यावर
शिणलास काया वाचा मने
घे विसावा ह्या वळणावर
संकटांशी केलास सामना
पुरुन उरलास तयांना
किती गौरवू तव यत्नांना
थांब जरासा इथे वळताना
प्रतिकूल परिस्थिती जरी
अखंड जिद्दीने लढलास
कधी हार नाही मानलीस
जरा थांब रे तू विसाव्यास
विश्वस्तांनी तुज सावरले
मदतीचे हात तुज दिले
मैत्रभाव बंधन पाळले
थांब रे कृतज्ञ वळणास
जीवन युद्धच घनघोर
मात मनुजाची संकटांवर
विसरुन सारे क्षणभर
घे विसावा ह्या वळणावर
वळणावरचा हा विसावा
शक्ती , उर्जा देईल तुजला
टवटवीत तनमनाने
पथ रम्य भासेल तुजला
