विषय - प्रेम म्हणजे काय असतं
विषय - प्रेम म्हणजे काय असतं
1 min
208
प्रेम म्हणजे काय असतं
रोज आईच्या हृदयातून झरतं
बाळा उपाशी राहू नकोस
आईच्या मुखातून पाझरतं
प्रेम म्हणजे काय असतं
बाबांच्या आकुलतेतून सरकतं
बाळा या महिन्यात पैसे पाठवतो
बाबांच्या काळजातून झिरपतं
प्रेम म्हणजे काय असतं
पत्नीच्या आसावल्या डोळ्यातून लाजतं
या महिन्यात फिरायला न्याल का
विचारणार्या तिच्या नजरेत सजतं
प्रेम म्हणजे काय असतं
मुलांच्या तोंडातुनच वाजतं
बाबा खेळणी आणा आम्हाला
मुलांच्या हट्टातूनच भाजतं
