विसावू जरा या वळणावर
विसावू जरा या वळणावर
1 min
513
विसावूया का जरा या वळणावर...
प्रवास क्षणांचा दीर्घ काळ चालला
सहवास मिनिटांचा संसार झाला
हातात हात आजही आहे, स्पर्श मात्र बोथट झाला
समोर तू ही आहे मी ही आहे ,
नजरेशी नजरेचा मात्र अबोला
तू तोच आहेस मी ही मीच आहे
अनोळखी संवाद मात्र दोघांतला
सुरू करू नवपर्व नव्या ओळखीचं
तू मला मी तुला पुन्हा पुन्हा जाणूया
स्पर्शाच प्रेम हळुवार फुलवूया
लपलेलं नजरेत ते परत गवसुया
विरहात हरवले जे परत जिंकूया
वेडावलेला तू, बेधुंद मी
तुझ्या माझ्यात नव्याने गुंतुया सुवर्णक्षण हे
वेचाया या वळणावर जरा विसावूया
