STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

विजयादशमी

विजयादशमी

1 min
211

सण  विजया  दशमी

आनंदाचा सौभाग्याचा

वैर  भावना  सोडून

एकमेकां  भेटण्याचा ।।१।।


भक्ती शक्ती समन्वय

आहे सण दसऱ्याचा

दिस शूर वीरां साठी 

यश विजय प्राप्तीचा ।।२।।


दुष्ट  रावण  मारून

राम जेव्हा आले घरा

आनंदले  सर्व  जण

केला उत्सव साजरा ।।३।।


शमी  वृक्षावर  वर्षा

झाली सुवर्ण मुद्रांची

इथे लपलेली  होती 

दिव्य अस्त्रे पांडवांची ।।४।।


सोने म्हणून शमीची

पाने एकमेकां देती

द्वेषा वर विजयाचे

आनंदाची फलप्राप्ती ।।५।।


पूर्व ग्रह  काढू  भेटू

प्रेमे  देऊ आलिंगन

रूढी सोडू कालबाह्य

करू सीमा उल्लंघन ।।६।।



Rate this content
Log in