वीज कोरोनाची
वीज कोरोनाची


कुण्या सांजवेळी, वावरात माझ्या अशी कडाडली वीज,
पाहुन उन्माद विजेचा मग गोंधळली सारी पाखरं.
पाना पानाशी खेळणारा देशवासी चार भिंतीत स्थिरावला,
अन् शिव्याशाप ऐकूनही रस्त्यावर पांडू रात्रंदिन उभा थांबला...
वीज पावलांचे ठसे, उमटले जागो जागी,
अन् मनुष्यनिर्मित मुर्तीतल्या, देवाची दारे बंद झाली.
माणसातला देव म्हणून आला धन्वंतरी दारोदारी,
मग हळूहळू देवळाचीच इस्पितळे बांधली गेली....
कोठली ती वीज, कुठूनशी माझ्या वावरात आली,
घास घेऊन पाखरांचे घात करुन गेली.
मृत पाखरे पाहून मळभ दाटून आले,
झुंकारुन नीज सारी वावर जागे झाले......
एका विजेने ओसाड झालं मोत्यासारखं वावरं,
अनावर झाला अश्रुंचा पूर, पाहता विजेचे थैमानं.
झुंज विजेची परी, झुंजण्या सज्ज निर्भीड मानव,
सलाम माऊली सलाम तुझ्या कर्तृत्वास.....