STORYMIRROR

Chandan Pawar

Others

3  

Chandan Pawar

Others

व्हॅलेंटाईन

व्हॅलेंटाईन

1 min
149

बायको म्हणाली नवऱ्याला

"तुमचे मजवर प्रेम आहे काय?"

किती 'व्हॅलेन्टाईन डे' गेले

आपण कधी साजरा केला काय?


त्यावर नवरा म्हणाला,"प्रिये

आपल्या प्रेमाचा देखावा कशाला?

मी म्हणजे तू, तू म्हणजे मी

त्याला 'व्हॅलेन्टाईन'हवा कशाला?"


आपल्या आजा-पंज्याने केला

कधी 'व्हॅलेन्टाईन' साजरा;

बाबांनी कधी घातला आईच्या

केसात मोगऱ्याचा गजरा.


बाजीराव-मस्तानीचे प्रेमधागे

'व्हॅलेन्टाईन' शिवाय जुळले ना?

नल-दमयंती, दृष्यत-शकुंतला

एकमेकांचे झालेच ना !


पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागून

आपण आपले संस्कार का विकावे?

राधा-कृष्णाच्या देशात प्रेम

कुण्या 'व्हॅलेन्टाईन' कडून का शिकावे?


असं एका दिवसात

ठरवूनप्रेम होतं का सुरू?

'झिंगाट' तारुण्याचे 'सैराट' 

बेगडी प्रेम बघून नको तू झुरू.


राधा-कृष्णासारखी आपण

जगावेगळी प्रीत करू;

म्हणून प्रिये, मजजवळ

'व्हॅलेन्टाईन'चा हट्ट नको धरू.


Rate this content
Log in