वेळ
वेळ
वेळ काही कुणाला
सांगून येत नाही
वेळ प्रत्येकाने पाळली
पाहिजे, वेळेला महत्व
दिले पाहिजे,एकदा
गेलेली वेळ पुन्हा
येत नाही आयुष्य
क्षणभंगुर आहे, वेळेची
गणितं मांडता आली
पाहिजेत
वेळेत झोपणे, वेळेत उठणे
चांगल्या आरोग्याचे सूचक
दिलेली वेळ पाळली तर
तर निर्माण होते खात्री
नाही पाळली वेळ तर
निर्माण होतो अविश्वास
वेळे मुळेच कळतं
गत , वर्तमान ,भविष्य
काळाचं नी वेळेच
जमत अतूट नातं
हे निभावण्यासाठी
करावी लागते धडपड
केले कार्य वेळेत
तर मिळते यश
केले दुर्लक्ष जर
तर मिळते अपयश
अपयशावर जर
करायची मात तर
करा वेळेशी मैत्री जी देईन सदैव खात्री
वेळेला सामोरे जा
परिस्थितीवर मात करा
सत्याची धरा कास,
असत्याचा करा विनाश
काळ आहे वाईट
लक्षात घ्या लवकर
वेळेत करा उपाय
करा आपुले हीत
करा नियोजन वेळेचे
साधा हीत सर्वांचे
येईल वेळ धावून
जाईल काळ पळून
