वचन देते....
वचन देते....
मी वचन देते की,
समाजातल्या बुरसटलेल्या विचारांना
अंतरंगात कधीच स्थान नाही देणार
जाणीवपूर्वक त्रास देणार्यांना
त्यांची मनमानी नाही करू देणार.....
चुक की बरोबर
याही पलिकडे सत्याचा शोध मी घेईल
कुणी खोटी गाथा रचली तर
त्याच्या तथ्यांचा शोध मी घेईन.....
सुख-दुःखाच्या पलिकडे
जग ही असतं हे स्वतःला सांगेन
आयुष्याच्या बागेत मनसोक्त जगायला शिकेन.....
मनातील आशा-आकांक्षा
यांचा घेईल माग मी
हरवलेल्या ध्येयाला
परत आणेन मार्गावर मी.....
वचन हे मला
नको ती नकारत्मक उर्जा
उषःकाल आता होऊ देऊ
पेटवू आशेची निरजा....
