वचन देते सख्या.....
वचन देते सख्या.....
1 min
123
फूल माळले केसात,
गंध दरवळला मनात,
सांगू कसे जनात,
तूच माझ्या हृदयात ।।
न कळे प्रेमाची भाषा,
प्रेममयी दाही दिशा,
माझ्या चित्ताची दशा,
सांग मी दावू कशा ।।
प्रेमाचे वचन तू दिधले,
संसार स्वप्न आकारले,
प्रेमी जीव आनंदिले,
तनमन तव सुखावले ।।
वचन देते सख्या तुज,
मानाचे स्थान दिलेस मज,
आयुष्य करुन अर्पण तुज,
कानी सांगीन सुखाचे गुज ।।
