STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Others

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Others

वैद्यकीय संगर हा

वैद्यकीय संगर हा

1 min
413

आली आली महामारी, कोरोना कोरोना

केली जगताची साऱ्या तिने पार दैना 


नव्हे आजार तू साधा एक अदृश्य राक्षस

होता माणसाची बाधा जणू पडे यम पाश

बघवेना बधितांच्या घोर यातना रे 

कोरोना कोरोना...


तुझ्या मुळे झाले अवघे व्यवहार ठप्प

जो जो घरी आहे तो तो बसू निया गप्प

उरतील भय भीती संपता संपेना 

कोरोना कोरोना...


मृत आणि बाधितांची संख्या वाढत आहे 

घर हेचि दवाखाना तेच योग्य आहे 

नका भटकू रे व्यर्थ, करा रक्तदान 


डॉक्टर,पोलिस,आया, कामा भिडल्या सिस्टर 

दिन रात लढताती वैद्यकीय हे संगर 

ह्या गितातूनी देतो मी त्यास मानवंदना 


पुरे थांबवी संहार, जगुदे सुखाने 

जाई जगातूनी आता, आल्या पावलाने 

विनवितो आलो दीन, देई जीवनदान

कोरोना कोरोना...


विसरुनी सारे धर्म, भेदभाव, पंथ

सज्ज झालो आम्ही आता तुझा करू अंत 

तुझा शिरच्छेद हाच तुला नजराणा

आली आली महामारी कोरोना कोरोना...


राजेंद्र वैद्य कल्याणकर (९८३३०१६७२५)


Rate this content
Log in