वाट तुझी पाही
वाट तुझी पाही


वेड्या मनास माझ्या, कसलेच भान नाही
ये ना समोरी सख्या, मी वाट तुझी पाही
बघताच रूप तुझे मला भावले मनाला
मनातील प्रेम आज, सांगू मी कुणाला
प्रेमात तुझ्या अशी, एकट्यात उभी राही
ये ना समोरी सख्या...........||1||
वाटे मला सोबत, तुझ्या जीवनात यावे
रंगात रंगून तुझ्या, स्वप्न पूर्ण करावे
सात जन्म सोबतीची देते तुला आज ग्वाही
ये ना समोरी सख्या...........||२||
तारे-चंद्र देतील साक्ष आपल्या प्रेमाला
खोटं नाही प्रेम माझं, विचार नभाला
जीवनात कधी मला, तुझ्याविना नको काही
ये ना समोरी सख्या..............||३||