STORYMIRROR

Raghu Deshpande

Classics Inspirational

4  

Raghu Deshpande

Classics Inspirational

वास्तव.....!!

वास्तव.....!!

1 min
206

ठेवले बांधुनी, स्वप्नांचे गाठोडे

जगाचे हातोडे, अति झाले....!


भरणे कठीण, पोटाची खळगी

सारी भ्रांत जगी, तयासाठी....!


शिणले शरीर, सुखाचा बोभाटा

आडमार्गी वाटा, गवसेणा....!


पावलो पावलो, उपकारे देवा

असा हेवादावा, कळो आला....!


याचीसाठी केला, जीवाचा आकांत

भेटूनी निवांत, सांगे तूज....!


कुणी न ये बाबा, वेळेला धावून

गुळासी पाहून, गोळा होती.....!


मातीचे शरीर, जीव ओतियेला

पूर्व कर्मे त्याला, आवळली.....!


ठरवूनी दिले, श्वासांचे गणित

एक कमी जास्त, सोय नाही....!


पराधीन जीव, जगी सारिपाट

कशाची ती ऐट, तुला आली.....?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics