वारीची वाट
वारीची वाट


ओढ तुला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तुला विठू मी माझा फाटका पदर...
दिलंस मला तू सोन्यासारखं ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याचं मन...
तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तुला भेटण्याची आस...
दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तुझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालतं वारीची वाट...