Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

वारांचे गाणे

वारांचे गाणे

1 min
1.8K




चला मुलांनो या रे या

लवकर भरभर सारे या

हसत खेळत शिकूया

वारांचे गाणे गाऊया।।धृ।।


पहिला वार सोमवार

शाळेत येन्या सारे तयार

रंगीत चित्रे बघुया।।१।।


नंतर आला मंगळवार

गावात भरलाया बाजार

पाटी न पेन्सिल घेऊया।।२।।


बुधवाराची आली स्वारी

वरणभाताची मजाच न्यारी

पोषण आहार चाखूया।।३।।


गुरूवार असे चौथा वार

आम्हा आवडतो खेळ फार

नवे नवे खेळ खेळूया।।४।।


शुक्रवारी तर भारी मजा

वर्गाला मिळतो नवा राजा

राजाचा मुकुट मिळवूया।।५।।


शनिवारी असे सारीच घाई

लवकर या म्हणतात बाई

बाईंचे म्हणणे ऐकुया।।६।।


रविवारी असे शाळा बंद

खेळून खेळून होऊ धुंद

थकून लवकर झोपूया।।७।।


आठवड्याचे वार सात

सारे मिळूनी करा पाठ

वारांची नावे सांगुया।।८।।


Rate this content
Log in