वाणी
वाणी
1 min
227
वाचा वाणी वैखरीचे
दैवदत्त वरदान
वाणी कुणाची मधुर
कधी ताडनाचे नाद
गोड वाणी जिंकितसे
सहजचि कुणालाही
येत गप्पांना बहर
स्थळ काळ विसरुनी
तिळगूळ प्रयोजन
गोड बोलावे म्हणूनी
भांडणांचा होत अंत
स्नेह गोड वाणीतुनी
गोड बोलूनी काढतो
काटा अलगद त्वरे
सावधान रहाणेच
चार कोस दूर बरे
कडू बोलावे लागते
पालकांस शिक्षकांस
शिस्त नि नियमांसाठी
मंत्र कठोर तयांस
खरा मित्र तोच असे
जाण देतसे धोक्यांची
कटू बोलणे तयाचे
अंती हो हितकरचि
वेळ काळ पाहूनिया
योग्य वाणी प्रयोजन
वक्ता दशसहस्त्रेषु
त्यास गौरविती जन
