STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

वाळूचे घड्याळ

वाळूचे घड्याळ

1 min
11.8K


वाळूचे घड्याळ 

लॉकडाऊन असलं 

म्हणून काय झालं 

वेळ थोडाच थांबलाय.....


तो तर निसटून चाललाय 

वाळूच्या घड्याळातील 

वाळूसारखा हळूहळू

खरं तर काहीच 

थांबलं नाही.....


सूर्य उगवतो, मावळतो 

चंद्र त्याचं काम करत आहे 

रात्र आणि दिवसाने कधीही 

विश्रांती घेतली नाही 

मग विश्रांती कोणाला? 

फक्त मानवाला...


कारण तो खूप धावत सुटला होता 

निसर्गाचे कोणतेही नियम न पाळता 

म्हणूनच निसर्गानेच 

केलंय त्याला लॉकडाऊन

तरीही वाळूचे घड्याळ मात्र 

त्याचं काम करत आहे

जणू ते सांगतंय "मानवा, संपत चाललंय तुझं आयुष्य वाळूच्या कणासारखं"


Rate this content
Log in