STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

वादळ

वादळ

1 min
12K


एक वादळ आले दाराशी 

संगे सोसाट्याचा वारा 

धुळीचे लोट सोबत घेऊन 

पडू लागल्या टपटप गारा


विजा कडाडत होत्या नभी 

झाली ढगांची दाट गर्दी

पावसाच्या सरींनी दिली 

कोसळण्याची थेट वर्दी


आलो आलो म्हणता म्हणता 

कोसळल्या त्या अंगावर 

थेंब थेंब झेलून झाला

अभिषेक तो जमिनीवर 


पानेफुले झाडेवेली 

सारेच लागलेत डोलू 

पावसात भिजताना 

मनातले प्रेम लागे बोलू 


Rate this content
Log in