वादळ संशयाचे
वादळ संशयाचे
1 min
11.8K
वादळ उठले जीवनात
संशयकल्लोळ माजला
घेतला हातात मोबाईल
काय होतं असे त्याजला
काम सारे करून
विरूंगुळ्यासाठी वापरते मोबाईल
तरी संशयास्पद पाहत असतो
डोळे वटारून मजला
गुलाम नाही मी असणार
विचार माझे मी मांडणार
भांडला किती जरी ही
स्वत्व मी माझे जपणार
आचार, विचार, उच्चार करून
नीट बोलत असताना
टोचून बोलणे चालत नाही
मत आपले मांडताना
मोकळे सांगून टाकले
हृदयात लपवलेले बंध
वादळ उठले होते संशयाचे
भूत मानगुटीवर बसलेलं छंद
