रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
15
रक्षाबंधन सण मोठा
नाही आनंदाचा तोटा
भाऊ बहिणीच्या प्रेमाची
होते आनंदाच्या भेटा.१
धागा प्रेमाचा बांधून
जीव भावाला लावला
सुख दुःख त्याचे जाणून
जीव मायेने व्याकूळला.२
आई परी जीव लावून
यश कीर्ती मागते देवाला
बंधूराज सुखी राहावा
म्हणून गोड नैवेद्य सणाला.३
हौसेने पुरवतो हट्ट
नाही देत कधी अंतर
पाठी राखा खंबीर
उभा
प्रेमाने असते मंतर.४
त्याच्या डोळ्यात अश्रू येता
कळ हदयात माझ्या येते
हळूच अश्रू पुसत
हिंमत त्याला देते.५