बायको
बायको
बायको ने बायको सारखे राहावे
घराचे घरपण जपावे,
साजशृंगार करूनी
प्रसन्न चित्ती असावे....१
दिनराती कष्ट करावे
घर स्वच्छ ठेवावे,
नवरा बाहेरून येता,मधाळ गोड हसावे
बायको ने बायको सारखे राहावे....२
सुग्रास भोजन करावे
तिचा हातखंड कोणी ना धरावे
पाहुण्यांचे स्वागत हसत मुखाने करावे
कारण, बायको ने बायको सारखे राहावे....३
मुलांचा सांभाळ करावे
कोणी सांभाळ करावे
कोणी आजारी पडले तर
काय हवे नको ते पहावे,
ना कोणाला टोचून बोलावे......४
नुसते कळसुत्री बाहुली परी काम करावे
चाबी भरलेल्या यांत्रिक बाहुली परी
बायको ने बायको सारखे राहावे....५
बायको ने कधी नसते
आजारी पडायचे,पडली तरी
सारे काम तिनेच करावे
नंतर मग आराम करावे.....६
बायको सुद्धा असते मानव
नाही ती कळसुत्री बाहुली
जरा मानवता दाखवून घरी
मग, सांग तु बायको ने बायको सारखे राहावे
ती असतेच तुझ्या शब्दाखाली.....७
थोडे प्रेमाने बोल खरी
ती तुझीच असता, नको समजू तू
यांत्रिक तिज बाहुली
तेव्हाच संसार सुखी होईल खरी....८
